S M L

पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराचे फायर ऑडिट

03 जुलैमंत्रालयातल्या आगीनंतर खडबडून जागं झालेल्या सरकारने सगळ्या सरकारी इमारतींचं फायर ऑडिट करायचा निर्णय घेतला. मुंबई खालोखाल पुण्यात सर्वात जास्त म्हणजे 17 विभागांच्या 96 शासकीय इमारतींचं फायर ऑडीट सुरू झालंय. पुणे महापालिकेच्या अखत्यारीतील असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचं ऑडिट पहिल्या दिवशी करण्यात आलं. फायर ब्रिगेडचे स्टेशन ऑफिसर समीर शेख यांनी बालगंधर्व रंगमंदिरातल्या अग्निशमन व्यवस्थेचा आढावा घेतला. हायड्रंट, फायर एक्स्टींग्विशर्स, स्पिंकलर्स, फायर एक्झीट, पाण्याच्या टाक्या यांची पाहणी केली. बालगंधर्व रंगमंदिर बांधून जवळपास 40 वर्षं झालीय. इथली आग प्रतिबंधक यंत्रणा अपग्रेड करायची गरज शेख यांनी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2012 02:58 PM IST

पुण्यात बालगंधर्व रंगमंदिराचे फायर ऑडिट

03 जुलै

मंत्रालयातल्या आगीनंतर खडबडून जागं झालेल्या सरकारने सगळ्या सरकारी इमारतींचं फायर ऑडिट करायचा निर्णय घेतला. मुंबई खालोखाल पुण्यात सर्वात जास्त म्हणजे 17 विभागांच्या 96 शासकीय इमारतींचं फायर ऑडीट सुरू झालंय. पुणे महापालिकेच्या अखत्यारीतील असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचं ऑडिट पहिल्या दिवशी करण्यात आलं. फायर ब्रिगेडचे स्टेशन ऑफिसर समीर शेख यांनी बालगंधर्व रंगमंदिरातल्या अग्निशमन व्यवस्थेचा आढावा घेतला. हायड्रंट, फायर एक्स्टींग्विशर्स, स्पिंकलर्स, फायर एक्झीट, पाण्याच्या टाक्या यांची पाहणी केली. बालगंधर्व रंगमंदिर बांधून जवळपास 40 वर्षं झालीय. इथली आग प्रतिबंधक यंत्रणा अपग्रेड करायची गरज शेख यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2012 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close