S M L

टीम अण्णांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

05 जुलैजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची टीम येत्या 25 जुलैपासून जंतरमंतरवर उपोषण करणार आहे. मात्र या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे टीम अण्णांनी उपोषण करुनच राहणार असा पवित्रा घेतला आहे. टीम अण्णांचे सदस्य अरंविद केजरीवाल,शांती भूषण यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग,प्रणव मुखर्जी, पि. चिदंबरम, शरद पवार, कपिल सिब्बल यांच्यासह 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. मात्र या चौकशीला कोर्टानं नकार दिलाय. चौकशी झालीच पाहिजे यामागणीसाठी टीम अण्णांचे सदस्य 25 जुलैपासून बेमुदत आंदोलन करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2012 11:07 AM IST

टीम अण्णांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

05 जुलै

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची टीम येत्या 25 जुलैपासून जंतरमंतरवर उपोषण करणार आहे. मात्र या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे टीम अण्णांनी उपोषण करुनच राहणार असा पवित्रा घेतला आहे. टीम अण्णांचे सदस्य अरंविद केजरीवाल,शांती भूषण यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग,प्रणव मुखर्जी, पि. चिदंबरम, शरद पवार, कपिल सिब्बल यांच्यासह 14 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. मात्र या चौकशीला कोर्टानं नकार दिलाय. चौकशी झालीच पाहिजे यामागणीसाठी टीम अण्णांचे सदस्य 25 जुलैपासून बेमुदत आंदोलन करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2012 11:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close