S M L

नागपुरात जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदारांवर हल्ला

प्रशांत कोरटकर, नागपूर05 जुलैनागपूरमध्ये जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदारावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. 50 पेक्षा जास्त लोकांनी हा हल्ला केल्याचं समजतयं. हत्येच्या प्रकरणातला हा साक्षीदार होता. कोर्टाच्या लॉबीत हा हल्ला झाला. 18 जणांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे हा हल्ला कोर्टाच्या लॉबीमध्येच झाला. दोन वर्षांपूर्वी व्हेरायटी चौकात झालेल्या खुनप्रकरणी सुनावणीसाठी काही साक्षीदारांना कोर्टापुढे हजर करण्यात येत होतं. परंतु, कोर्टाच्या लॉबीमध्ये आधीपासून उपस्थित असलेल्या काही लोकांनी या साक्षीदारांवर जीवघेणा हल्ला केला.जिल्हा न्यायालयात साक्षीदारांवर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही, याआधीही अनेकदा आपल्याविरोधात साक्ष दिली जाऊ नये यासाठी साक्षीदारांना न्यायालयातून पळवल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर 2004 मध्ये कुख्यात गुंड अक्कू यादव याला भर कोर्टात ठेचून मारण्यात आलं. तसेच न्यायालयात गुंडांनी धुमाकूळ घातल्याचे अनेक प्रकार घडले आहे. प्रत्येक घटनेनंतर पोलिसांची गस्त वाढवली जाते. परंतु, नंतर परिस्थिती मात्र जैसे थे राहते.कोर्ट सुरु असताना खटल्याशी निगडीत व्यक्तींच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही कोर्टाच्या आवारात प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी होऊनदेखील याबद्दल प्रशासन उदासीनच राहिलं आहे, त्यामुळंच गुंडांची हिंमत वाढताना दिसतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2012 03:29 PM IST

नागपुरात जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदारांवर हल्ला

प्रशांत कोरटकर, नागपूर

05 जुलै

नागपूरमध्ये जिल्हा सत्र न्यायालयात साक्षीदारावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. 50 पेक्षा जास्त लोकांनी हा हल्ला केल्याचं समजतयं. हत्येच्या प्रकरणातला हा साक्षीदार होता. कोर्टाच्या लॉबीत हा हल्ला झाला. 18 जणांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे हा हल्ला कोर्टाच्या लॉबीमध्येच झाला. दोन वर्षांपूर्वी व्हेरायटी चौकात झालेल्या खुनप्रकरणी सुनावणीसाठी काही साक्षीदारांना कोर्टापुढे हजर करण्यात येत होतं. परंतु, कोर्टाच्या लॉबीमध्ये आधीपासून उपस्थित असलेल्या काही लोकांनी या साक्षीदारांवर जीवघेणा हल्ला केला.

जिल्हा न्यायालयात साक्षीदारांवर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही, याआधीही अनेकदा आपल्याविरोधात साक्ष दिली जाऊ नये यासाठी साक्षीदारांना न्यायालयातून पळवल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर 2004 मध्ये कुख्यात गुंड अक्कू यादव याला भर कोर्टात ठेचून मारण्यात आलं. तसेच न्यायालयात गुंडांनी धुमाकूळ घातल्याचे अनेक प्रकार घडले आहे. प्रत्येक घटनेनंतर पोलिसांची गस्त वाढवली जाते. परंतु, नंतर परिस्थिती मात्र जैसे थे राहते.

कोर्ट सुरु असताना खटल्याशी निगडीत व्यक्तींच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही कोर्टाच्या आवारात प्रवेश दिला जाऊ नये, अशी मागणी होऊनदेखील याबद्दल प्रशासन उदासीनच राहिलं आहे, त्यामुळंच गुंडांची हिंमत वाढताना दिसतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2012 03:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close