S M L

अभिनेत्री लैला खानची कुटुंबीयांसह हत्या

05 जुलैपाकिस्तानी अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांची मुंबईत हत्या झाली असावी अशी शक्यता जम्मू काश्मीर पोलिसांनी व्यक्त केली आहे. 11 महिन्यांपूर्वी लैला खान तिच्या कुटुंबीयांसह इगतपुरीहून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी लैला खानचा मित्र परवेझ टाक याला जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याच्या चौकशीतून लैला खानचा मुंबईतच खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. डोडा - रामबान क्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक गरिब दास यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी अधिक तपासासाठी आता जम्मू काश्मीर पोलिसांचं एक पथक मुंबईत येणार आहे. दरम्यान, ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये लैला खानचं अपहरण झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2012 11:24 AM IST

अभिनेत्री लैला खानची कुटुंबीयांसह हत्या

05 जुलै

पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांची मुंबईत हत्या झाली असावी अशी शक्यता जम्मू काश्मीर पोलिसांनी व्यक्त केली आहे. 11 महिन्यांपूर्वी लैला खान तिच्या कुटुंबीयांसह इगतपुरीहून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी लैला खानचा मित्र परवेझ टाक याला जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याच्या चौकशीतून लैला खानचा मुंबईतच खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. डोडा - रामबान क्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक गरिब दास यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी अधिक तपासासाठी आता जम्मू काश्मीर पोलिसांचं एक पथक मुंबईत येणार आहे. दरम्यान, ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये लैला खानचं अपहरण झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2012 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close