S M L

राजकारण्यांमुळे गरिबांना घरं मिळत नाही -पाटकर

05 जुलैराजकारणी आणि पोलिसांनी बिल्डरांशी संगनमत केल्यानं गरिबांना हक्काचं घर मिळत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय. गृहनिर्माण : बिल्डरशाही का लोकतंत्र या विषयावर मुंबईत जनसुनावणी झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचा दुरुपयोग सुरु आहे. बिल्डरांना बड्या मंत्र्यांचा आशिर्वाद असल्याचंही या जनसुनावणीत मार्गदर्शन करणार्‍या मान्यवरांनी सांगितलं. गरिबांना हक्काचं घर कसं मिळेल, म्हाडा आणि एमएमआरडीए (MMRDA)ने कोणतीही पुनर्वसन योजना ठरवताना लोकसुनावणी घेणं आवश्यक असल्याचं मत या जनसुनावणीत व्यक्त करण्यात आलं. यावेळी बंगलोरच्या कातियानी,एमएमआरडीएच्या उमा अडसुल,डॉ.सिध्दार्थ ढेंढे, अशोक दातार,अमिता भीडे यांनी विकास आराखडयांवर आपली मतं मांडली. मुंबईत सुरु असलेल्या एसआरए योजनांमधील पिडीत मोठ्या संख्येनं या जनसुनावणीस हजर होते. ह्युमन राईट्स लॉ नेटवर्क या जनसुनावणीचा अहवाल प्रकाशित करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2012 12:44 PM IST

राजकारण्यांमुळे गरिबांना घरं मिळत नाही -पाटकर

05 जुलै

राजकारणी आणि पोलिसांनी बिल्डरांशी संगनमत केल्यानं गरिबांना हक्काचं घर मिळत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय. गृहनिर्माण : बिल्डरशाही का लोकतंत्र या विषयावर मुंबईत जनसुनावणी झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचा दुरुपयोग सुरु आहे. बिल्डरांना बड्या मंत्र्यांचा आशिर्वाद असल्याचंही या जनसुनावणीत मार्गदर्शन करणार्‍या मान्यवरांनी सांगितलं.

गरिबांना हक्काचं घर कसं मिळेल, म्हाडा आणि एमएमआरडीए (MMRDA)ने कोणतीही पुनर्वसन योजना ठरवताना लोकसुनावणी घेणं आवश्यक असल्याचं मत या जनसुनावणीत व्यक्त करण्यात आलं. यावेळी बंगलोरच्या कातियानी,एमएमआरडीएच्या उमा अडसुल,डॉ.सिध्दार्थ ढेंढे, अशोक दातार,अमिता भीडे यांनी विकास आराखडयांवर आपली मतं मांडली. मुंबईत सुरु असलेल्या एसआरए योजनांमधील पिडीत मोठ्या संख्येनं या जनसुनावणीस हजर होते. ह्युमन राईट्स लॉ नेटवर्क या जनसुनावणीचा अहवाल प्रकाशित करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2012 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close