S M L

रॉजर फेडररची फायनलमध्ये धडक

06 जुलैरॉजर फेडररनं विम्बल्डनच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये फेडररनं डिफेण्डिंग चॅम्पियन आणि वर्ल्ड नंबर वन नोवॅक जोकोविचचा 6-3, 3-6, 6-4, 6-3 अशा चार सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये जोकोविचची सर्व्हिस भेदत फेडररनं आघाडी घेतली आणि ती टीकवत तो सेट 6-3 असा जिंकला. तर दुसर्‍या सेटमध्ये जोकोविचनं कमबॅक करत सेट 6-4 असा खिशात घातला. पण त्यानंतर पुढच्या दोन्ही सेटमध्ये मोक्याच्या क्षणी फेडररने जोकोविचची सर्व्हिस भेदली आणि दोनही सेट आरामात जिंकले. रॉजर फेडररनं तब्बल 6 वेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावलंय. त्यामुळे आता तब्बल सातव्यांदा विम्बल्डन जेतेपद पटकावण्याची त्याला नामी संधी आहे. तर 8 वेळा विम्बल्डन फायनल गाठण्याचा अनोखा रेकॉर्डही फेडररनं केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 6, 2012 04:52 PM IST

रॉजर फेडररची फायनलमध्ये धडक

06 जुलै

रॉजर फेडररनं विम्बल्डनच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये फेडररनं डिफेण्डिंग चॅम्पियन आणि वर्ल्ड नंबर वन नोवॅक जोकोविचचा 6-3, 3-6, 6-4, 6-3 अशा चार सेटमध्ये पराभव केला. पहिल्या सेटमध्ये जोकोविचची सर्व्हिस भेदत फेडररनं आघाडी घेतली आणि ती टीकवत तो सेट 6-3 असा जिंकला. तर दुसर्‍या सेटमध्ये जोकोविचनं कमबॅक करत सेट 6-4 असा खिशात घातला. पण त्यानंतर पुढच्या दोन्ही सेटमध्ये मोक्याच्या क्षणी फेडररने जोकोविचची सर्व्हिस भेदली आणि दोनही सेट आरामात जिंकले. रॉजर फेडररनं तब्बल 6 वेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावलंय. त्यामुळे आता तब्बल सातव्यांदा विम्बल्डन जेतेपद पटकावण्याची त्याला नामी संधी आहे. तर 8 वेळा विम्बल्डन फायनल गाठण्याचा अनोखा रेकॉर्डही फेडररनं केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2012 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close