S M L

कळणे मायनिंगमधून 9 लाख टन अवैध खाणकाम

07 जुलै सिंधुदुर्ग येथील कळणे मायनिंग प्रकरणी आयबीएन लोकमतच्या हाती नवा अहवाल लागला आहे. या अहवालात 9 लाख 34 हजार 800 टनाचे अवैध खाणकाम झाले असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. तसेच 13 हजार 501 घनमिटरचे नविन जादा उत्खनन झाले. हा अहवाल 24 मे रोजी शासनासमोर सादर करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणी अजून कोणतीही कारवाई झाली नाही. कळणे मायनिंगवर बेकायदा खनिज उत्खनन प्रकरणी कोल्हापूर खनिकर्म विभागाने पहिल्यांदा डिसेंबर 2011 मध्ये केलेल्या तपासणीत कळणे मायनिंगमधून मोठ्या प्रमाणात बेकायदा लोहखनिज काढलं गेल्याचं पुढे आलं होतं. मात्र, या अहवालावर कोणतीही कारवाई होत नसल्याचं लक्षात येताच आयबीएन लोकमतने आवाज उठवून हा अहवाल जनतेसमोर आणला होता. त्यानंतर खुद्द खाण राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही 15 दिवसात योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही दिलं होतं. त्याला दीड महिना होत आला तरी कळणे मायनिंगवर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनावर खाणमालकांना पाठीशी घालणार्‍या राजकीय नेत्यांचा दबाव असल्याचं कळणेचे ग्रामस्थांचे म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2012 10:18 AM IST

कळणे मायनिंगमधून 9 लाख टन अवैध खाणकाम

07 जुलै

सिंधुदुर्ग येथील कळणे मायनिंग प्रकरणी आयबीएन लोकमतच्या हाती नवा अहवाल लागला आहे. या अहवालात 9 लाख 34 हजार 800 टनाचे अवैध खाणकाम झाले असल्याचे तपासणीत उघड झाले आहे. तसेच 13 हजार 501 घनमिटरचे नविन जादा उत्खनन झाले. हा अहवाल 24 मे रोजी शासनासमोर सादर करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणी अजून कोणतीही कारवाई झाली नाही.

कळणे मायनिंगवर बेकायदा खनिज उत्खनन प्रकरणी कोल्हापूर खनिकर्म विभागाने पहिल्यांदा डिसेंबर 2011 मध्ये केलेल्या तपासणीत कळणे मायनिंगमधून मोठ्या प्रमाणात बेकायदा लोहखनिज काढलं गेल्याचं पुढे आलं होतं. मात्र, या अहवालावर कोणतीही कारवाई होत नसल्याचं लक्षात येताच आयबीएन लोकमतने आवाज उठवून हा अहवाल जनतेसमोर आणला होता. त्यानंतर खुद्द खाण राज्यमंत्री सचिन अहिर यांनीही 15 दिवसात योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही दिलं होतं. त्याला दीड महिना होत आला तरी कळणे मायनिंगवर अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनावर खाणमालकांना पाठीशी घालणार्‍या राजकीय नेत्यांचा दबाव असल्याचं कळणेचे ग्रामस्थांचे म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2012 10:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close