S M L

पैठणमध्ये विषबाधेमुळे 14 मोरांचा मृत्यू

09 जुलैपैठण तालुक्यातील खादगाव शिवारात 14 मोर, तितर,चिमण्या,कोकीळा या मुक्याप्राण्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना घडली आहे. खादगाव शिवारात सध्या पेरणीचा हंगाम सुरु असून पेरणीदरम्यान शेतकरी किटनाशकांचा वापर करतात. शिवराचा परिसर जंगलाशी जवळ असल्यामुळे प्राण्याचा वावर नेहमी शेतात होतो. रविवारी सकाळी आठ वाजता शंकर बाबुराव छबिलवाड हे आपल्या शेतात आले तेव्हा त्यांना महादेव कोहकडे यांच्या शेतात 14 मोर,15 तितर,चिमण्या आणि कोकीळा आदी पक्षी मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. मृत्यूमुखी पडलेल्या 14 मोरांचे शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये पक्ष्यांच्या पोटात ज्वारीचे दाणे आणि खत आढळून आले आहे. पक्ष्यांचा मृत्यूहा विषबाधेमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय. पक्ष्यांना जाणुनबुजून विष देण्यात आले का असा संशयही व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी 3 शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 9, 2012 11:55 AM IST

पैठणमध्ये विषबाधेमुळे 14 मोरांचा मृत्यू

09 जुलै

पैठण तालुक्यातील खादगाव शिवारात 14 मोर, तितर,चिमण्या,कोकीळा या मुक्याप्राण्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घडना घडली आहे. खादगाव शिवारात सध्या पेरणीचा हंगाम सुरु असून पेरणीदरम्यान शेतकरी किटनाशकांचा वापर करतात. शिवराचा परिसर जंगलाशी जवळ असल्यामुळे प्राण्याचा वावर नेहमी शेतात होतो. रविवारी सकाळी आठ वाजता शंकर बाबुराव छबिलवाड हे आपल्या शेतात आले तेव्हा त्यांना महादेव कोहकडे यांच्या शेतात 14 मोर,15 तितर,चिमण्या आणि कोकीळा आदी पक्षी मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. मृत्यूमुखी पडलेल्या 14 मोरांचे शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये पक्ष्यांच्या पोटात ज्वारीचे दाणे आणि खत आढळून आले आहे. पक्ष्यांचा मृत्यूहा विषबाधेमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय. पक्ष्यांना जाणुनबुजून विष देण्यात आले का असा संशयही व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी 3 शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2012 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close