S M L

सलमान खुर्शीद यांचं घुमजाव

10 जुलैकेंद्रीय कायदा मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेस नेतृत्त्व, तसेच राहुल गांधींवर टीका केली होती. पण आज एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला, असं स्पष्टीकरण दिलंय. काँग्रेस नेतृत्त्व दिशाहीन झाल्याचं सांगत त्यांनी पक्षाला थेट घरचा आहेर दिला होता. त्याचबरोबर राहुल गांधींकडून पक्षाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत पण युवक काँग्रेसची निवडणूक सोडली तर, त्यांच्याकडून आत्तापर्यंत पक्षाला कुठलाही ठोस विचार मिळाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षापुढं आव्हानं असल्याचा पुनरुच्चार केला. शिवाय युवा नेतृत्त्वानंही आता पक्ष पुढं नेण्यासाठी तयार व्हायला हवं असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच पक्षातल्या त्रुटी सुधारण्याची प्रक्रिया ही चालतच राहते. त्यावर भाष्य केलं तर त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये, असंही खुर्शीद यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 10, 2012 11:11 AM IST

सलमान खुर्शीद यांचं घुमजाव

10 जुलै

केंद्रीय कायदा मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेस नेतृत्त्व, तसेच राहुल गांधींवर टीका केली होती. पण आज एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला, असं स्पष्टीकरण दिलंय. काँग्रेस नेतृत्त्व दिशाहीन झाल्याचं सांगत त्यांनी पक्षाला थेट घरचा आहेर दिला होता. त्याचबरोबर राहुल गांधींकडून पक्षाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत पण युवक काँग्रेसची निवडणूक सोडली तर, त्यांच्याकडून आत्तापर्यंत पक्षाला कुठलाही ठोस विचार मिळाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षापुढं आव्हानं असल्याचा पुनरुच्चार केला. शिवाय युवा नेतृत्त्वानंही आता पक्ष पुढं नेण्यासाठी तयार व्हायला हवं असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच पक्षातल्या त्रुटी सुधारण्याची प्रक्रिया ही चालतच राहते. त्यावर भाष्य केलं तर त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये, असंही खुर्शीद यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2012 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close