S M L

महापालिकेच्या शाळांचा खासगीकरणाचा घाट

10 जुलैमुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी महापालिकेनं खासगीकरणाचा घाट घातला आहे. खासगी शैक्षणिक संस्थांना महापालिकेच्या शाळा लोकांचा सहभाग या नावाखाली चालवायला देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. 11 जुलैला होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. या प्रस्तावाला आहे त्या स्वरूपात मंजुरी मिळाली तर महापालिकेच्या शाळा खासगी संस्थांच्या ताब्यात जातील असा आरोप मनसेनं केला आहे. तर या प्रस्तावावर सखोल चर्चेची मागणीही मनसेने केली आहे. शाळा चालवण्यासाठी घेणार्‍या संस्थेवर महापालिका देखरेख करेल असं प्रस्तावात नमूद करण्यात आलंय. त्यासाठी नेमल्या जाणार्‍या समितीत आयुक्त आणि शिक्षण विषयातील अभ्यासू व्यक्तींचा समावेश असेल. मात्र हा प्रस्ताव आहे तसा मान्य केला तर सेव्हन हिल्स हॉस्पिटलवर महापालिकेला जसे नियंत्रण मिळवणे जड जात आहे तसे शाळांच्या बाबतीत होऊ शकेल असा आरोप मनसे करतंय. त्यामुळे उद्या होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत हा वाद चांगलाच रंगेल असं दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 10, 2012 02:38 PM IST

महापालिकेच्या शाळांचा खासगीकरणाचा घाट

10 जुलै

मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी महापालिकेनं खासगीकरणाचा घाट घातला आहे. खासगी शैक्षणिक संस्थांना महापालिकेच्या शाळा लोकांचा सहभाग या नावाखाली चालवायला देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. 11 जुलैला होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. या प्रस्तावाला आहे त्या स्वरूपात मंजुरी मिळाली तर महापालिकेच्या शाळा खासगी संस्थांच्या ताब्यात जातील असा आरोप मनसेनं केला आहे.

तर या प्रस्तावावर सखोल चर्चेची मागणीही मनसेने केली आहे. शाळा चालवण्यासाठी घेणार्‍या संस्थेवर महापालिका देखरेख करेल असं प्रस्तावात नमूद करण्यात आलंय. त्यासाठी नेमल्या जाणार्‍या समितीत आयुक्त आणि शिक्षण विषयातील अभ्यासू व्यक्तींचा समावेश असेल. मात्र हा प्रस्ताव आहे तसा मान्य केला तर सेव्हन हिल्स हॉस्पिटलवर महापालिकेला जसे नियंत्रण मिळवणे जड जात आहे तसे शाळांच्या बाबतीत होऊ शकेल असा आरोप मनसे करतंय. त्यामुळे उद्या होणार्‍या स्थायी समितीच्या बैठकीत हा वाद चांगलाच रंगेल असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2012 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close