S M L

कटक वनडेत भारतापुढे 271 रन्सचं आव्हान

26 नोव्हेंबर कटकभारत आणि इंग्लंड दरम्यान कटक इथं सुरू असलेल्या वन डेमध्ये भारताने टॉस जिंकून इंग्लंडला पहिली बॅटिंग दिली.अ‍ॅलिस्टर कूक आणि रवि बोपारा यांनी फटकेबाजी करून सुरुवात चांगली केली. पण झहीरने अ‍ॅलिस्टर कूकला सहाव्या ओव्हरमध्ये आऊट केलं त्याने 10 रन्स केले. इंग्लंडच्या टीमला या मॅचमध्ये सामना करावा लागणार आहे तो कटकमधल्या उकाड्याशी. त्याशिवाय रात्रीच्या वेळी इथली आर्द्रताही 91 टक्क्यांपर्यंत वाढते. भारतीय टीमने या मॅचमध्ये दोन बदल केले आहेत. मुनाफ पटेल ऐवजी इरफान पठाणला संधी देण्यात आली आणि गंभीरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी रोहित शर्मा टीममध्ये परत आला आहे. सात मॅचच्या या सीरीजमध्ये भारतीय टीम चार शून्यने आघाडीवर आहे. रवि बोपाराने 24 रन्स केले त्यालाही झहिरने आऊट केलं.इंग्लंडचा कॅप्टन पीटरसनने सेंच्युरी पूर्ण केली त्याने 111 रन्स केले. त्याच्यासाथीला शहानेही 66 रन्स केले. कॉलिवूड 40 तर फ्लिंटॉफ शून्यावर आऊट झाले. इंग्लंडने 50ओव्हरमध्ये चार विकेटवर 270 रन्स केले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2008 12:40 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2008 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close