S M L

राज्यात गुटखा बंदीचा निर्णय

11 जुलैगुटखा खाऊन भिंती रंगवण्यार्‍या गुटखा बहादुरांचे तोंड आता बंद होणार आहे. राज्य सरकारने अखेर गुटखा आणि पान मसाला सेवन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारचा 100 कोटींचा महसूल बुडणार आहे. मात्र नागरिकांच्या प्रकृतीची काळजी घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य हे गुटखाबंदी करणारे तिसरे राज्य ठरले आहे.मागिल महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महसूल बुडाला तरी चालले पण गुटखा बंदी केली जाईल असा धाडसी निर्णय घेतला होता. या निर्णयाची औपचारी घोषणा मागिल महिन्यात 20 ते 21 जून दरम्यान होणार होती. मात्र काही कारणामुळे ती पुढे ढकलली. अखेर राज्य सरकार आपला शब्द पाळत आजही घोषणा केली आहे. यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्या सर्व पदार्थांवर कडक बंदी घालण्यात येणार आहे. तसेच गुटखा सेवन करणे, विक्री करणे या सर्वांवर बंदी घालण्यात येणार आहे. मॅग्नेशियम कार्बोनेट हा आरोग्याला अतिशय हानिकारक पदार्थ आहे. त्यामुळे इतर कोणत्याही गुटखा अथवा पानमसाला सारख्या पदार्थात जर मॅग्नेशियम कार्बोनेट आढळून आले तर त्यावर सुध्दा बंदी घालण्यात येणार आहे. एकंदरीत राज्य सरकारचा निर्णय महागडा जरी असला पण जनतेच्या फायदेचा नक्की ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 11, 2012 04:48 PM IST

राज्यात गुटखा बंदीचा निर्णय

11 जुलै

गुटखा खाऊन भिंती रंगवण्यार्‍या गुटखा बहादुरांचे तोंड आता बंद होणार आहे. राज्य सरकारने अखेर गुटखा आणि पान मसाला सेवन आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारचा 100 कोटींचा महसूल बुडणार आहे. मात्र नागरिकांच्या प्रकृतीची काळजी घेत सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य हे गुटखाबंदी करणारे तिसरे राज्य ठरले आहे.मागिल महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महसूल बुडाला तरी चालले पण गुटखा बंदी केली जाईल असा धाडसी निर्णय घेतला होता. या निर्णयाची औपचारी घोषणा मागिल महिन्यात 20 ते 21 जून दरम्यान होणार होती. मात्र काही कारणामुळे ती पुढे ढकलली. अखेर राज्य सरकार आपला शब्द पाळत आजही घोषणा केली आहे. यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्या सर्व पदार्थांवर कडक बंदी घालण्यात येणार आहे. तसेच गुटखा सेवन करणे, विक्री करणे या सर्वांवर बंदी घालण्यात येणार आहे. मॅग्नेशियम कार्बोनेट हा आरोग्याला अतिशय हानिकारक पदार्थ आहे. त्यामुळे इतर कोणत्याही गुटखा अथवा पानमसाला सारख्या पदार्थात जर मॅग्नेशियम कार्बोनेट आढळून आले तर त्यावर सुध्दा बंदी घालण्यात येणार आहे. एकंदरीत राज्य सरकारचा निर्णय महागडा जरी असला पण जनतेच्या फायदेचा नक्की ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2012 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close