S M L

दुष्काळासाठी 2,625 कोटींच्या पॅकेजची घोषणा

11 जुलैविधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात आज दुष्काळावर चर्चा झाली. अखेर सरकारने दुष्काळ निवारणासाठी 2 हजार 625 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पतंगराव कदम यांनी विधानसभेत ही घोषणा केली. दुपारी दोन वाजता चर्चा सुरू झाली. सुमारे सहा तास ही चर्चा चालली. चर्चेच्या सुरवातीला मुख्यमंत्र्यांसह अनेक महत्त्वाचे नेते गैरहजर होते. त्यानंतर जेव्हा सरकारने दुष्काळाच्या चर्चेला उत्तर दिलं तेव्हा विरोधी पक्षनेत्यांसह इतरही अनेक नेते गैरहजर होते. एकंदरितच, दुष्काळाच्या या चर्चेबद्दल सरकार आणि विरोधी पक्ष दोघंही उदासीनच होते. त्यामुळे फक्त पॅकेज जाहीर करून काय होणार असा प्रश्न उपस्थित झालाय. दुष्काळावर चर्चेच्या वेळी कोणत्या आमदारानं काय भूमिका मांडली ?विनोद तावडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद- पतंगराव कदम यांनी दुष्काळ निवारणासाठी केलेल्या घोषणा प्रत्यक्षात आल्याच नाहीत. - सरकार शेतकर्‍यांना आणि जनावारांना जगवण्याचा प्रयत्न करतच नाही- फक्त टॅकर माफिया आणि चारा माफियाना जगवण्याचा सरकारचा प्रयत्न.रामदास कदम, आमदार, शिवसेना - दुष्काळाबाबत पुर्वानुभवातूनही आपण काही शिकलो नाही का ?- सभाग़ृहातही मंत्र्यांचा दुष्काळ का ? - शासनाला या चर्चेचं किती गांभीर्य आहे याची यावरुन कल्पना येते- दुष्काळ हा मानवनिर्मीत आहे. निसर्ग निर्मीत नाही- 70 हजार कोटी फक्त ठेकेदारांसाठी खर्च झालेशोभाताई फडणवीस, आमदार, भाजप- हवामानाचे अंदाज नेहमीच चुकतात. त्याचा फटका शेतकर्‍याना बसतो. - आणेवारीची पध्दत चुकीची आहे. त्यामूळे दुष्काळ एकीकडे तर उपाय दुसरीकडे अशी स्थिती. - शेतकर्याची थट्टा चालवलीय सरकारने .नाना पटोळे, आमदार, भाजप- चारा घोटाळा झालाय. सरकार म्हणतय दुष्काळ मिडियाने निर्माण केलाय. मग सरकारने ठेकेदारांच्या भल्यासाठी दुष्काळ निवारणाच्या तरतुदी केल्यात का ?- हवामान खात्याच्या चुकलेल्या अंदाजाचा फटकाही शेतकर्‍यांंना बसतोय. पेरण्या वाया गेल्यात त्यामूळे हवामान खात्याला चागल तंत्रज्ञान उपलब्ध करुन द्या.- जवळपास सगळे पाटबंधारे प्रकल्प म्हणजे राजकरण्यांची कुरण झालीत. - गेल्यावर्षी 2000 कोटीच पॅकेज शेतकर्‍यासाठी जाहीर झालं पण अजुनही अनेकापर्यत हे पैसे पोहचलेच नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 11, 2012 05:15 PM IST

दुष्काळासाठी 2,625 कोटींच्या पॅकेजची घोषणा

11 जुलै

विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात आज दुष्काळावर चर्चा झाली. अखेर सरकारने दुष्काळ निवारणासाठी 2 हजार 625 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पतंगराव कदम यांनी विधानसभेत ही घोषणा केली. दुपारी दोन वाजता चर्चा सुरू झाली. सुमारे सहा तास ही चर्चा चालली. चर्चेच्या सुरवातीला मुख्यमंत्र्यांसह अनेक महत्त्वाचे नेते गैरहजर होते. त्यानंतर जेव्हा सरकारने दुष्काळाच्या चर्चेला उत्तर दिलं तेव्हा विरोधी पक्षनेत्यांसह इतरही अनेक नेते गैरहजर होते. एकंदरितच, दुष्काळाच्या या चर्चेबद्दल सरकार आणि विरोधी पक्ष दोघंही उदासीनच होते. त्यामुळे फक्त पॅकेज जाहीर करून काय होणार असा प्रश्न उपस्थित झालाय.

दुष्काळावर चर्चेच्या वेळी कोणत्या आमदारानं काय भूमिका मांडली ?

विनोद तावडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद- पतंगराव कदम यांनी दुष्काळ निवारणासाठी केलेल्या घोषणा प्रत्यक्षात आल्याच नाहीत. - सरकार शेतकर्‍यांना आणि जनावारांना जगवण्याचा प्रयत्न करतच नाही- फक्त टॅकर माफिया आणि चारा माफियाना जगवण्याचा सरकारचा प्रयत्न.

रामदास कदम, आमदार, शिवसेना

- दुष्काळाबाबत पुर्वानुभवातूनही आपण काही शिकलो नाही का ?- सभाग़ृहातही मंत्र्यांचा दुष्काळ का ? - शासनाला या चर्चेचं किती गांभीर्य आहे याची यावरुन कल्पना येते- दुष्काळ हा मानवनिर्मीत आहे. निसर्ग निर्मीत नाही- 70 हजार कोटी फक्त ठेकेदारांसाठी खर्च झाले

शोभाताई फडणवीस, आमदार, भाजप- हवामानाचे अंदाज नेहमीच चुकतात. त्याचा फटका शेतकर्‍याना बसतो. - आणेवारीची पध्दत चुकीची आहे. त्यामूळे दुष्काळ एकीकडे तर उपाय दुसरीकडे अशी स्थिती. - शेतकर्याची थट्टा चालवलीय सरकारने .नाना पटोळे, आमदार, भाजप

- चारा घोटाळा झालाय. सरकार म्हणतय दुष्काळ मिडियाने निर्माण केलाय. मग सरकारने ठेकेदारांच्या भल्यासाठी दुष्काळ निवारणाच्या तरतुदी केल्यात का ?- हवामान खात्याच्या चुकलेल्या अंदाजाचा फटकाही शेतकर्‍यांंना बसतोय. पेरण्या वाया गेल्यात त्यामूळे हवामान खात्याला चागल तंत्रज्ञान उपलब्ध करुन द्या.- जवळपास सगळे पाटबंधारे प्रकल्प म्हणजे राजकरण्यांची कुरण झालीत. - गेल्यावर्षी 2000 कोटीच पॅकेज शेतकर्‍यासाठी जाहीर झालं पण अजुनही अनेकापर्यत हे पैसे पोहचलेच नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2012 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close