S M L

'रुस्तुम-ए-हिंद' दारासिंग यांचं निधन

13 जुलैरुस्तुम-ए-हिंद आणि टीव्हीवरील रामायण या मालिकेत हनुमानाची भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते दारासिंग यांचे आज राहत्याघरी मुंबईत निधन झालं. ते 84 वर्षाचे होते. गेल्या दहा दिवसांपासून ते कोकोलिबेन हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंझ देत होते. काल बुधवारी रात्री दारासिंग यांना आपल्या राहत्या घरी नेण्यात आलं होतं. आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण आपल्या कुटुंबियांसोबत असावं अशी त्यांची इच्छा होती. आज सकाळी सात वाजेच्या सुमाराला ह्रदयविकाराचा झटका आल्याने निधन झालं. दुपारी 2 वाजता त्यांच्यांवर अंत्यसंस्कारर करण्यात आले. उत्तम अभिनेता आणि उमदा माणूस हरवल्याची खंत, यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. राम भक्त 'हनुमान' रामायणातून घराघरांत पोचला. आणि मोठ्या पडद्यावरचे रफ अँड टफ आजोबाही सगळ्यांना आवडले. दारासिंग यांनी साकारलेला हनुमान अजरामर झाला. तर जब वुई मेटमधले आजोबाही लक्षात राहिले. कुस्तिवीर दारा सिंग यांनी 100 पेक्षा जास्त सिनेमे केले. आणि अनेक मालिकाही. 2003ला राज्यसभेसाठीही ते निवडले गेले.अभिनय करण्याआधी ते कुस्ती खेळायचे. 19 नोव्हेंबर 1928 ला जन्मलेले दारा सिंग अमृतसरचे. 6 फूट 2 इंच उंचीचे दारा सिंग आपल्या धट्‌ट्याकट्या तब्येतीसाठी प्रसिद्ध होते. तरुणपणापासूनच त्यांनी कुस्ती खेळायला सुरुवात केली होती.वयाच्या 18 व्या वर्षी ते सिंगापूरला गेले. तिथे त्यांनी बर्‍याच नोकर्‍या केल्या. सोबत कुस्तीची प्रॅक्टिस सुरू होतीच. 1954 मध्ये दारा सिंग बनले भारताचे कुस्ती चँपियन बनले. नंतर 1959 मध्ये कॉमन वेल्थ चँपियनशिपचा सन्मान मिऴाल्यानंतर 1968 मध्ये वर्ल्ड चँपियन झाले. आणि 1983 मध्ये त्यांनी कुस्तीपासून निवृत्ती घेतली.1962 मध्ये रुस्तम ए हिंद मोठ्या पडद्याकडे वळले. 1963 मध्ये फौलाद आणि लगेचच पुढच्या वर्षी हरक्युलस रिलीज झाले. अनेक हिंदी आणि पंजाबी सिनेमांमध्ये त्यांनी हिरोची भूमिका केली. अभिनेत्री मुमताझलाही त्यांनीच इंट्रोड्युस केलं. दोघांनी मिळून 16 सिनेमे केले.दारा सिंग यांनी काही सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं. पण कल हो ना होमधले प्रेमळ आजोबाच शेवटपर्यंत सगळ्यांच्या लक्षात राहिले. दारा सिंग यांना आयबीएन लोकमतची आदरांजली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 11, 2012 06:01 PM IST

'रुस्तुम-ए-हिंद' दारासिंग यांचं निधन

13 जुलै

रुस्तुम-ए-हिंद आणि टीव्हीवरील रामायण या मालिकेत हनुमानाची भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते दारासिंग यांचे आज राहत्याघरी मुंबईत निधन झालं. ते 84 वर्षाचे होते. गेल्या दहा दिवसांपासून ते कोकोलिबेन हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंझ देत होते. काल बुधवारी रात्री दारासिंग यांना आपल्या राहत्या घरी नेण्यात आलं होतं. आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण आपल्या कुटुंबियांसोबत असावं अशी त्यांची इच्छा होती. आज सकाळी सात वाजेच्या सुमाराला ह्रदयविकाराचा झटका आल्याने निधन झालं. दुपारी 2 वाजता त्यांच्यांवर अंत्यसंस्कारर करण्यात आले. उत्तम अभिनेता आणि उमदा माणूस हरवल्याची खंत, यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.

राम भक्त 'हनुमान' रामायणातून घराघरांत पोचला. आणि मोठ्या पडद्यावरचे रफ अँड टफ आजोबाही सगळ्यांना आवडले. दारासिंग यांनी साकारलेला हनुमान अजरामर झाला. तर जब वुई मेटमधले आजोबाही लक्षात राहिले. कुस्तिवीर दारा सिंग यांनी 100 पेक्षा जास्त सिनेमे केले. आणि अनेक मालिकाही. 2003ला राज्यसभेसाठीही ते निवडले गेले.अभिनय करण्याआधी ते कुस्ती खेळायचे. 19 नोव्हेंबर 1928 ला जन्मलेले दारा सिंग अमृतसरचे. 6 फूट 2 इंच उंचीचे दारा सिंग आपल्या धट्‌ट्याकट्या तब्येतीसाठी प्रसिद्ध होते. तरुणपणापासूनच त्यांनी कुस्ती खेळायला सुरुवात केली होती.

वयाच्या 18 व्या वर्षी ते सिंगापूरला गेले. तिथे त्यांनी बर्‍याच नोकर्‍या केल्या. सोबत कुस्तीची प्रॅक्टिस सुरू होतीच. 1954 मध्ये दारा सिंग बनले भारताचे कुस्ती चँपियन बनले. नंतर 1959 मध्ये कॉमन वेल्थ चँपियनशिपचा सन्मान मिऴाल्यानंतर 1968 मध्ये वर्ल्ड चँपियन झाले. आणि 1983 मध्ये त्यांनी कुस्तीपासून निवृत्ती घेतली.

1962 मध्ये रुस्तम ए हिंद मोठ्या पडद्याकडे वळले. 1963 मध्ये फौलाद आणि लगेचच पुढच्या वर्षी हरक्युलस रिलीज झाले. अनेक हिंदी आणि पंजाबी सिनेमांमध्ये त्यांनी हिरोची भूमिका केली. अभिनेत्री मुमताझलाही त्यांनीच इंट्रोड्युस केलं. दोघांनी मिळून 16 सिनेमे केले.

दारा सिंग यांनी काही सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केलं. पण कल हो ना होमधले प्रेमळ आजोबाच शेवटपर्यंत सगळ्यांच्या लक्षात राहिले. दारा सिंग यांना आयबीएन लोकमतची आदरांजली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2012 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close