S M L

गोंदियात आश्रमशाळेत 6 विद्यार्थ्यांना सर्पदंश, दोघांचा मृत्यू

12 जुलैगोंदिया जिल्हातील एका आश्रमशाळेत साप चावल्यानं दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. यातील दोन विद्यार्थ्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. देवरी तालुक्यातील मकरधोकडा इथल्या आश्रमशाळेतील ही घटना आहे. झोपेत असतांना या विद्यार्थ्यांना पहाटे 4 वाजेच्या दरम्यान काही तरी चावल्याचं या मुलांना कळलं. पण काही कळायच्या आतच एक विद्यार्थी दगावला. तर जवळच्या आरोग्य केंद्रात नेत असताना दुसर्‍या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. 4 विद्यार्थ्यांना गोंदियाच्या बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2012 09:49 AM IST

गोंदियात आश्रमशाळेत 6 विद्यार्थ्यांना सर्पदंश, दोघांचा मृत्यू

12 जुलै

गोंदिया जिल्हातील एका आश्रमशाळेत साप चावल्यानं दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. यातील दोन विद्यार्थ्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. देवरी तालुक्यातील मकरधोकडा इथल्या आश्रमशाळेतील ही घटना आहे. झोपेत असतांना या विद्यार्थ्यांना पहाटे 4 वाजेच्या दरम्यान काही तरी चावल्याचं या मुलांना कळलं. पण काही कळायच्या आतच एक विद्यार्थी दगावला. तर जवळच्या आरोग्य केंद्रात नेत असताना दुसर्‍या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. 4 विद्यार्थ्यांना गोंदियाच्या बजाज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2012 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close