S M L

गरीब विद्यार्थी खासगी शाळेच्या दारातच उभे

12 जुलैशिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत केंद्र सरकारनं शिक्षण हक्क कायदा मंजूर केला. त्याअंतर्गत गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये 25 टक्के जागा या राखीव ठेवण्यात आल्या. त्यानुसार राज्य सरकारनंही शिक्षण हक्क कायदा मंजूर केला. पण या कायद्यांतर्गत किती गरीब विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला, याची आकडेवारी अजूनपर्यंत राज्य सरकारने जाहीर केली नाही. पण आयबीएन लोकमतने ही आकडेवारी मिळवलेय. तब्बल 44 हजार 886 विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा दावा सरकारने केलाय. मात्र, ही आकडेवारी फसवी आणि फुगवलेली असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केलाय. कारण, प्रत्यक्षात गरिबांना प्रवेश द्यायला खाजगी शाळा टाळाटाळ करतायत. सरकारने 10 जून ही प्रवेशासाठी दिलेली डेडलाईनच अपुरी होती, अशी तक्रार पालकांनी केलीय. खासगी शाळेच्या मनमानी कारभारामुळे गरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या दारावरच उभे केले आहे. त्यामुळे कायदा मंजूर होऊनही अनेक गरीब मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. गरीब शिक्षणापासून दूरच ?सोलापूर- 4280नांदेड- 3729जळगाव- 3305बीड- 3095नाशिक- 3100पुणे (शहर)- 3008धुळे- 2496कोल्हापूर- 2994उस्मानाबाद- 2071परभणी- 1717सांगली - 1889औरंगाबाद- 1619पुणे (जिल्हा)- 1363

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2012 12:29 PM IST

गरीब विद्यार्थी खासगी शाळेच्या दारातच उभे

12 जुलै

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत केंद्र सरकारनं शिक्षण हक्क कायदा मंजूर केला. त्याअंतर्गत गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये 25 टक्के जागा या राखीव ठेवण्यात आल्या. त्यानुसार राज्य सरकारनंही शिक्षण हक्क कायदा मंजूर केला. पण या कायद्यांतर्गत किती गरीब विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला, याची आकडेवारी अजूनपर्यंत राज्य सरकारने जाहीर केली नाही. पण आयबीएन लोकमतने ही आकडेवारी मिळवलेय. तब्बल 44 हजार 886 विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा दावा सरकारने केलाय. मात्र, ही आकडेवारी फसवी आणि फुगवलेली असल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केलाय. कारण, प्रत्यक्षात गरिबांना प्रवेश द्यायला खाजगी शाळा टाळाटाळ करतायत. सरकारने 10 जून ही प्रवेशासाठी दिलेली डेडलाईनच अपुरी होती, अशी तक्रार पालकांनी केलीय. खासगी शाळेच्या मनमानी कारभारामुळे गरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या दारावरच उभे केले आहे. त्यामुळे कायदा मंजूर होऊनही अनेक गरीब मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. गरीब शिक्षणापासून दूरच ?सोलापूर- 4280नांदेड- 3729जळगाव- 3305बीड- 3095नाशिक- 3100पुणे (शहर)- 3008धुळे- 2496कोल्हापूर- 2994उस्मानाबाद- 2071परभणी- 1717सांगली - 1889औरंगाबाद- 1619पुणे (जिल्हा)- 1363

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2012 12:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close