S M L

मुरुम चोरी प्रकरणी कंत्राटदार मनिष त्यागीला अटक

12 जुलैपिंपरी चिंचवड मुरुम चोरी प्रकरणी अखेर कंत्राटदार मनिष त्यागीला अटक करण्यात आली आहे. मनिषकडे शेकडो ब्रास मुरुम साठा आढळला असून पोलिसांनी हा साठा जप्त केला आहे. आतापर्यंत या प्रकरणी संदीप बोराडे, योगेश शेटे, योगेश भदाणे अशा 4 जणांना अटक करण्यात आली आहे. मुरुम चोरी प्रकरणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेत उपस्थीत करणार आहेत. मुरुम चोरीकडे दुर्लक्ष करणार्‍या प्राधीकरण आणि महसूल अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा नाही तर आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला. पिंपरीतल्या मुरूम चोरीचा मुद्दा सगळ्यात आधी आयबीएन लोकमतनं उचलून धरला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2012 03:34 PM IST

मुरुम चोरी प्रकरणी कंत्राटदार मनिष त्यागीला अटक

12 जुलै

पिंपरी चिंचवड मुरुम चोरी प्रकरणी अखेर कंत्राटदार मनिष त्यागीला अटक करण्यात आली आहे. मनिषकडे शेकडो ब्रास मुरुम साठा आढळला असून पोलिसांनी हा साठा जप्त केला आहे. आतापर्यंत या प्रकरणी संदीप बोराडे, योगेश शेटे, योगेश भदाणे अशा 4 जणांना अटक करण्यात आली आहे. मुरुम चोरी प्रकरणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेत उपस्थीत करणार आहेत. मुरुम चोरीकडे दुर्लक्ष करणार्‍या प्राधीकरण आणि महसूल अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा नाही तर आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला. पिंपरीतल्या मुरूम चोरीचा मुद्दा सगळ्यात आधी आयबीएन लोकमतनं उचलून धरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2012 03:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close