S M L

'तटकरेंवरील आरोपांची आर्थिक गुन्हे शाखेकडून होणार तपासणी'

13 जुलैजलसंपदा मंत्री सुनील तटकरेंविरोधातल्या आरोपांची तपासणी करून चौकशीचा निर्णय घेऊ असं आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय. तटकरे यांनी पदाचा दुरुपयोग करत बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याप्रकरणी तटकरेंविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यावर आज आर.आर.पाटील यांनी सभागृहात उत्तर दिलं. तटकरेंवर असलेल्या आरोपांची आर्थिक गुन्हे शाखा तपासणी करणार या तपासणीनंतरच चौकशीचा निर्णय घेऊ, असं आर. आर. पाटलांनी म्हटलंय. दरम्यान आज विधान परिषदेत सिंचन प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले. सरकारने सिंचनचा निधी नेमका कुठे खर्च केला याबाबतची श्वेतपत्रिका कधी काढणार असा प्रश्न विरोधकांनी विचारला. यावर बिगरशेती कामांसाठी पाण्याचा वापर वाढल्याने शेतीसाठी कमी पाणी मिळत असल्याचं कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानं विरोधक आक्रमक झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2012 01:04 PM IST

'तटकरेंवरील आरोपांची आर्थिक गुन्हे शाखेकडून होणार तपासणी'

13 जुलै

जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंविरोधातल्या आरोपांची तपासणी करून चौकशीचा निर्णय घेऊ असं आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलंय. तटकरे यांनी पदाचा दुरुपयोग करत बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याप्रकरणी तटकरेंविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यावर आज आर.आर.पाटील यांनी सभागृहात उत्तर दिलं. तटकरेंवर असलेल्या आरोपांची आर्थिक गुन्हे शाखा तपासणी करणार या तपासणीनंतरच चौकशीचा निर्णय घेऊ, असं आर. आर. पाटलांनी म्हटलंय.

दरम्यान आज विधान परिषदेत सिंचन प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले. सरकारने सिंचनचा निधी नेमका कुठे खर्च केला याबाबतची श्वेतपत्रिका कधी काढणार असा प्रश्न विरोधकांनी विचारला. यावर बिगरशेती कामांसाठी पाण्याचा वापर वाढल्याने शेतीसाठी कमी पाणी मिळत असल्याचं कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानं विरोधक आक्रमक झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2012 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close