S M L

'कळणे'मध्ये अवैध खाणकाम सरकारी तपासात उघड

12 जुलैसिंधुदुर्गातल्या कळणेमध्ये अवैध खाणकाम सुरू असल्याचं आता राज्य सरकारच्या खनिकर्म विभागाच्या तपासातही उघड झालंय. तसा अहवाल राज्य सरकारच्या खनिकर्म विभागाने तयार केला आहे. हा अहवाल आता इंडियन ब्युरो ऑफ मायनिंगकडे पाठवण्यात आला आहे. कळणेमध्ये होत असलेल्या बेकायदा मायनिंगबाबतच्या या गोपनीय अहवालातले काही प्रमुख मुद्दे आयबीएन लोकमतच्या हाती लागले आहेत. मिनरल्स अँड मेटल्स या कंपनीने कळणेमध्ये अवैधपणे खाणकाम केलंय, हेच या अहवालात उघड झालंय. या अहवालामध्ये संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची शिफारस सरकारने केलीय. महाराष्ट्र रिमोट सॅटेलाईट आणि गूगल अर्थच्या मदतीने ही पाहणी करण्यात आलीय. मंजूर करण्यात आलेल्या क्षेत्राच्या बाहेर अवैध खाणकाम झाल्याचं यात स्पष्ट झालंय. अवैध खाणकामासाठी कलेक्टरने मिनरल्स अँड मेटल्स या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावलीय. खनिकर्म राज्यमंत्री सचिन अहिर यांनी हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडेही पाठवलाय. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चार सदस्यांची समिती नेमलीय. या समितीच्या अहवालानंतर याबद्दल कारवाई होण्याची शक्यता आहे.कळणे मायनिंगवर कारवाई- सर्व्हे नं. 57/3 आणि सर्व्हे नं. 57/4 मध्ये बेकायदा खाणकाम- मिनेरल्स अँड मेटल्स कंपनीने केलं खाणकाम- मंजूर क्षेत्राबाहेर खाणकाम- 9 लाख 34 हजार मेट्रिक टन अवैध खाणकाम- कंपनीला कारणे दाखवा नोटीस- महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड कायद्यानुसार कारवाई

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2012 05:16 PM IST

'कळणे'मध्ये अवैध खाणकाम सरकारी तपासात उघड

12 जुलै

सिंधुदुर्गातल्या कळणेमध्ये अवैध खाणकाम सुरू असल्याचं आता राज्य सरकारच्या खनिकर्म विभागाच्या तपासातही उघड झालंय. तसा अहवाल राज्य सरकारच्या खनिकर्म विभागाने तयार केला आहे. हा अहवाल आता इंडियन ब्युरो ऑफ मायनिंगकडे पाठवण्यात आला आहे.

कळणेमध्ये होत असलेल्या बेकायदा मायनिंगबाबतच्या या गोपनीय अहवालातले काही प्रमुख मुद्दे आयबीएन लोकमतच्या हाती लागले आहेत. मिनरल्स अँड मेटल्स या कंपनीने कळणेमध्ये अवैधपणे खाणकाम केलंय, हेच या अहवालात उघड झालंय. या अहवालामध्ये संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची शिफारस सरकारने केलीय.

महाराष्ट्र रिमोट सॅटेलाईट आणि गूगल अर्थच्या मदतीने ही पाहणी करण्यात आलीय. मंजूर करण्यात आलेल्या क्षेत्राच्या बाहेर अवैध खाणकाम झाल्याचं यात स्पष्ट झालंय. अवैध खाणकामासाठी कलेक्टरने मिनरल्स अँड मेटल्स या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावलीय. खनिकर्म राज्यमंत्री सचिन अहिर यांनी हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडेही पाठवलाय. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी चार सदस्यांची समिती नेमलीय. या समितीच्या अहवालानंतर याबद्दल कारवाई होण्याची शक्यता आहे.कळणे मायनिंगवर कारवाई

- सर्व्हे नं. 57/3 आणि सर्व्हे नं. 57/4 मध्ये बेकायदा खाणकाम- मिनेरल्स अँड मेटल्स कंपनीने केलं खाणकाम- मंजूर क्षेत्राबाहेर खाणकाम- 9 लाख 34 हजार मेट्रिक टन अवैध खाणकाम- कंपनीला कारणे दाखवा नोटीस- महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड कायद्यानुसार कारवाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2012 05:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close