S M L

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार

14 जुलैविधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. काँग्रेस चौथा उमेदवार देणार नसल्यामुळे आता 11 जागांसाठी 11 उमेदवार आहेत. आज दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपली. काँग्रेस चौथा उमेदवार न देऊन शिवसेनेच्या दुसर्‍या उमेदवाराचा मार्ग मोकळा करून दिला आहे. शिवसेनेकडून अनिल परब आणि विनायक राऊत यांनी उमेदवारी दिलीये. उमेदवार उभा न करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयामुळे नारायण राणे यांना धक्का मानला जातोय. त्याचबरोबर शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी दिलेल्या पाठिंब्याची काँग्रेसनं उमेदवार उभा न करून परतफेड केल्याचं बोललं जातंय. त्याचबरोबर शेकापच्या जयंत पाटील यांचाही खडतर मार्ग काँग्रेसनं सुकर केला. जयंत पाटलांना अप्रत्यक्ष मदत करून काँग्रेसनं राष्ट्रवादीला शह दिला. दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार निवडीत माणिकरावंचं वर्चस्व राहिलं. पण नारायण राणेंचा एक समर्थक आमदार तर कमी झालाच पण त्यांच्या समर्थकाला उमेदवारीही मिळू दिलेली नाही. काँग्रेसमाणिकराव ठाकरेसंजय दत्तशरद रणपिसे राष्ट्रवादी काँग्रेसजयदेव गायकवाडनरेंद्र पाटील अमरसिंह पंडित भाजपविजय गिरकर आशिष शेलार शिवसेनाविनायक राऊतअनिल परबशेकापजयंत पाटील

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 14, 2012 09:26 AM IST

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार

14 जुलै

विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. काँग्रेस चौथा उमेदवार देणार नसल्यामुळे आता 11 जागांसाठी 11 उमेदवार आहेत. आज दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख संपली. काँग्रेस चौथा उमेदवार न देऊन शिवसेनेच्या दुसर्‍या उमेदवाराचा मार्ग मोकळा करून दिला आहे. शिवसेनेकडून अनिल परब आणि विनायक राऊत यांनी उमेदवारी दिलीये. उमेदवार उभा न करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयामुळे नारायण राणे यांना धक्का मानला जातोय. त्याचबरोबर शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी दिलेल्या पाठिंब्याची काँग्रेसनं उमेदवार उभा न करून परतफेड केल्याचं बोललं जातंय. त्याचबरोबर शेकापच्या जयंत पाटील यांचाही खडतर मार्ग काँग्रेसनं सुकर केला. जयंत पाटलांना अप्रत्यक्ष मदत करून काँग्रेसनं राष्ट्रवादीला शह दिला. दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार निवडीत माणिकरावंचं वर्चस्व राहिलं. पण नारायण राणेंचा एक समर्थक आमदार तर कमी झालाच पण त्यांच्या समर्थकाला उमेदवारीही मिळू दिलेली नाही.

काँग्रेसमाणिकराव ठाकरेसंजय दत्तशरद रणपिसे

राष्ट्रवादी काँग्रेसजयदेव गायकवाडनरेंद्र पाटील अमरसिंह पंडित भाजपविजय गिरकर आशिष शेलार

शिवसेनाविनायक राऊतअनिल परब

शेकापजयंत पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 14, 2012 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close