S M L

अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी एकाला अटक

14 जुलैउस्मानाबादमध्ये गडदेवदरी गावात छेड काढल्यामुळे एका चौदा वर्षाच्या मुलीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आता आरोपी लखन आढाव या 22 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आणि चौकशीनंतर लखनला अटक करण्यात आली. छेड काढल्यानंतर दुखावलेल्या या मुलीनं स्वत:ला जाळून घेतलंय. यात ती मुलगी 70 ते 80 टक्के भाजलीय. तिला उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी काल रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 14, 2012 09:36 AM IST

अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी एकाला अटक

14 जुलै

उस्मानाबादमध्ये गडदेवदरी गावात छेड काढल्यामुळे एका चौदा वर्षाच्या मुलीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आता आरोपी लखन आढाव या 22 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आणि चौकशीनंतर लखनला अटक करण्यात आली. छेड काढल्यानंतर दुखावलेल्या या मुलीनं स्वत:ला जाळून घेतलंय. यात ती मुलगी 70 ते 80 टक्के भाजलीय. तिला उस्मानाबादच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी काल रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 14, 2012 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close