S M L

भर रस्त्यावर 20 तरुणांकडून मुलीची छेडछाड, 4 जणांना अटक

13 जुलैआसामची राजधानी गुवाहाटीत 20 जणांच्या समुहानं भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपुर्वीची ही घटना आहे. ही मुलगी आपल्या मित्रांसोबत रात्री वाढदिवसाची पार्टी करुन घरी परतत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलानी या मुलीवर अश्लील शेरेबाजी केली, त्यावरुन दोघामध्ये वाद झाला. या वादानंतर जवळच उभ्या असलेल्या 20 तरुणांनी या मुलीवर हल्ला केला. तिचा विनयभंग केला, मारहाण केली हे नराधम एवढ्यावरच थांबले नाही तर या मुलीचे कपडे फाडण्याचा प्रयत्नही केला. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार भर रस्त्यावर सुरु असताना कुणीही या मुलीच्या बचावासाठी आलं नाही. दरम्यान, या घटनेची व्हिडीव्होग्राफी क रण्यात आली होती हा व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केल्यानंतर झालेला प्रकार समोर आला. पोलिसांनी फुटेजच्या साह्यानं 7 आरोपींची ओळख केली आहे. मात्र 20 जणांपैकी फक्त 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2012 11:01 AM IST

भर रस्त्यावर 20 तरुणांकडून मुलीची छेडछाड, 4 जणांना अटक

13 जुलै

आसामची राजधानी गुवाहाटीत 20 जणांच्या समुहानं भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपुर्वीची ही घटना आहे. ही मुलगी आपल्या मित्रांसोबत रात्री वाढदिवसाची पार्टी करुन घरी परतत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलानी या मुलीवर अश्लील शेरेबाजी केली, त्यावरुन दोघामध्ये वाद झाला. या वादानंतर जवळच उभ्या असलेल्या 20 तरुणांनी या मुलीवर हल्ला केला. तिचा विनयभंग केला, मारहाण केली हे नराधम एवढ्यावरच थांबले नाही तर या मुलीचे कपडे फाडण्याचा प्रयत्नही केला. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार भर रस्त्यावर सुरु असताना कुणीही या मुलीच्या बचावासाठी आलं नाही. दरम्यान, या घटनेची व्हिडीव्होग्राफी क रण्यात आली होती हा व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केल्यानंतर झालेला प्रकार समोर आला. पोलिसांनी फुटेजच्या साह्यानं 7 आरोपींची ओळख केली आहे. मात्र 20 जणांपैकी फक्त 4 जणांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2012 11:01 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close