S M L

पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी

14 जुलैलांबलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यातल्या डाळींबाच्या बागा सुकून चालल्या आहेत. टँकरने पाणी विकत घेऊन बागा जगवण्याचा प्रयत्न सटाणा तालुक्यातील शेतकरी करत आहेत. येत्या 15 दिवसात समाधानकारक पाऊस पडला नाही तर टँकरलाही पाणी मिळणार नाही अशी भयानक अवस्था होण्याची शक्यता आहे. एका बागेसाठी लागतात साधारण पाच-सहा टँकर आणि एका टँकरसाठी पाचशे रुपये त्यामुळे शेवटी उत्पादन खर्च वाढत चालला आहे. आधी तेल्या आणि मर या रोगांच्या प्रर्दुभावाचा परिणाम झाला आणि आता पाणीटंचाई भासू लागल्यानं शेतकरी संकटात आहे. मे महिन्यापासून बागेला टँकरनं पाणी पुरवून डाळींब उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. आता जुलै अर्धा उलटला तरी पावसाचा पत्ता नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 14, 2012 09:40 AM IST

पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी

14 जुलै

लांबलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यातल्या डाळींबाच्या बागा सुकून चालल्या आहेत. टँकरने पाणी विकत घेऊन बागा जगवण्याचा प्रयत्न सटाणा तालुक्यातील शेतकरी करत आहेत. येत्या 15 दिवसात समाधानकारक पाऊस पडला नाही तर टँकरलाही पाणी मिळणार नाही अशी भयानक अवस्था होण्याची शक्यता आहे. एका बागेसाठी लागतात साधारण पाच-सहा टँकर आणि एका टँकरसाठी पाचशे रुपये त्यामुळे शेवटी उत्पादन खर्च वाढत चालला आहे. आधी तेल्या आणि मर या रोगांच्या प्रर्दुभावाचा परिणाम झाला आणि आता पाणीटंचाई भासू लागल्यानं शेतकरी संकटात आहे. मे महिन्यापासून बागेला टँकरनं पाणी पुरवून डाळींब उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. आता जुलै अर्धा उलटला तरी पावसाचा पत्ता नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 14, 2012 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close