S M L

टोल नाक्यावर 60 रुपयांची पावती देऊन 1,100 रुपयांची लूट

14 जुलैऔरंगाबाद शहरालगत असलेल्या छावणी टोलनाक्यावर साठ रुपयांची पावती देऊन अकराशे रुपये वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाहेरुन येणार्‍या ट्रक चालकांकडून आणि वाहन धारकांकडून सक्तीने वाटेल ती रक्कम वसूल करण्याचे प्रकार काही दिवसांपासून सुरु होते. आज याच टोलनाक्यावर मुंबईहून अमरावतीकडे निघालेल्या ट्रक चालकाकडून साठ रुपयांची पावती देऊन अकराशे रुपये वसूल करण्यात आले. ट्रकचालकानं जाब विचारल्यानंतर उलट धमकावल्याने चालकाने छावणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या आधारे छावणी पोलिसांनी पाच जणांना अटक के ली आहे. विशेष म्हणजे या टोलनाक्याचे कंत्राट हे मयूर एंटरप्राईजेसकडे नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 14, 2012 10:45 AM IST

टोल नाक्यावर 60 रुपयांची पावती देऊन 1,100 रुपयांची लूट

14 जुलै

औरंगाबाद शहरालगत असलेल्या छावणी टोलनाक्यावर साठ रुपयांची पावती देऊन अकराशे रुपये वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाहेरुन येणार्‍या ट्रक चालकांकडून आणि वाहन धारकांकडून सक्तीने वाटेल ती रक्कम वसूल करण्याचे प्रकार काही दिवसांपासून सुरु होते. आज याच टोलनाक्यावर मुंबईहून अमरावतीकडे निघालेल्या ट्रक चालकाकडून साठ रुपयांची पावती देऊन अकराशे रुपये वसूल करण्यात आले. ट्रकचालकानं जाब विचारल्यानंतर उलट धमकावल्याने चालकाने छावणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या आधारे छावणी पोलिसांनी पाच जणांना अटक के ली आहे. विशेष म्हणजे या टोलनाक्याचे कंत्राट हे मयूर एंटरप्राईजेसकडे नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 14, 2012 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close