S M L

सुनीताची टीम पोहचली स्पेस स्टेशनमध्ये

17 जुलैभारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिच्या टीमनं आज थेट अंतराळातून संवाद साधला. सुनीता आणि तीची टीम रविवारी कझाकिस्तानच्या स्पेस स्टेशनहून रवाना झाले होते. आज पहाटे सव्वा तीन वाजता सुनीता आणि तिची टीम सुरुक्षीत अंतरळातील स्पेस स्टेशनमध्ये सुखरुप पोहचली आहे.गेले दोन दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आज त्यांचं सोयुझ टीएमए - 05 हे अंतराळयान रशियाने बांधलेल्या स्पेस स्टेशनवर पोहचलं आहे. एक्सपिडिशन-32 चे कमांडर जेनेडी पाडल्का, फ्लाईट इंजिनिअर जो अकाबा आणि सेरजी रेवीन यांनी या स्पेस स्टेशनवर आपल्या टीमचं स्वागत केलं.त्यानंतर पहिल्यांदाचं सुनीतानं इंटरनॅशनल स्पेस स्टेशहून नासामधल्या आपल्या सहकार्‍यांशी संवाद साधला. या सहा जणांच्या टीमने नासाच्या मुख्य केंद्राशी संवाद साधत सुखरुप असल्याचं सांगितलं. सुनीताच्या टीममध्ये रशियाच्या फेडरल स्पेस एजन्सीचा फ्लाईट इंजिनिअर युरी मालचेन्को, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशनचा अकिहिको होशिडे हे सहकारी आहे. याआधी 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर 6 महिने राहण्याचा विक्रम आहे. तिने सोबत एक बेडुक आणि एक मासा नेला आहे. अंतराळात प्राणी कसे राहतात याचं निरिक्षण त्यामुळे शक्य होणार आहे. एक्सपिडिशन-32 ही मोहिम यावर्षी नोव्हेंबरमध्ये संपणार आहे आणि या मोहिमेची सुनीता विल्यम्स ही फ्लाईट इंजिनिअर आहे. रशियाने बांधलेल्या बेकानूर स्पेस स्टेशनला दोन दिवसात ही टीम पोहचेल. या मोहिमेत दोनदा स्पेस वॉक असणार आहे. तसेच या मोहिमेचा उद्देश जपान, अमेरिका, रशिया आणि इतर अंतराळयानांना साहित्य आणि मदत पुरवणं असा आहे. 46 वर्षाच्या सुनीता विल्यम्सचे विक्रमसर्वाधिक प्रदिर्घ अंतराळ प्रवास - 195 दिवससर्वाधिक वेळा अंतराळात तरंगत चालणे - स्पेस वॉक 4 वेळासर्वाधिक काळ स्पेस वॉक - 29 तास 19 मिनिटं

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 17, 2012 08:50 AM IST

सुनीताची टीम पोहचली स्पेस स्टेशनमध्ये

17 जुलै

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिच्या टीमनं आज थेट अंतराळातून संवाद साधला. सुनीता आणि तीची टीम रविवारी कझाकिस्तानच्या स्पेस स्टेशनहून रवाना झाले होते. आज पहाटे सव्वा तीन वाजता सुनीता आणि तिची टीम सुरुक्षीत अंतरळातील स्पेस स्टेशनमध्ये सुखरुप पोहचली आहे.गेले दोन दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आज त्यांचं सोयुझ टीएमए - 05 हे अंतराळयान रशियाने बांधलेल्या स्पेस स्टेशनवर पोहचलं आहे. एक्सपिडिशन-32 चे कमांडर जेनेडी पाडल्का, फ्लाईट इंजिनिअर जो अकाबा आणि सेरजी रेवीन यांनी या स्पेस स्टेशनवर आपल्या टीमचं स्वागत केलं.त्यानंतर पहिल्यांदाचं सुनीतानं इंटरनॅशनल स्पेस स्टेशहून नासामधल्या आपल्या सहकार्‍यांशी संवाद साधला. या सहा जणांच्या टीमने नासाच्या मुख्य केंद्राशी संवाद साधत सुखरुप असल्याचं सांगितलं.

सुनीताच्या टीममध्ये रशियाच्या फेडरल स्पेस एजन्सीचा फ्लाईट इंजिनिअर युरी मालचेन्को, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशनचा अकिहिको होशिडे हे सहकारी आहे. याआधी 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर 6 महिने राहण्याचा विक्रम आहे. तिने सोबत एक बेडुक आणि एक मासा नेला आहे. अंतराळात प्राणी कसे राहतात याचं निरिक्षण त्यामुळे शक्य होणार आहे. एक्सपिडिशन-32 ही मोहिम यावर्षी नोव्हेंबरमध्ये संपणार आहे आणि या मोहिमेची सुनीता विल्यम्स ही फ्लाईट इंजिनिअर आहे. रशियाने बांधलेल्या बेकानूर स्पेस स्टेशनला दोन दिवसात ही टीम पोहचेल. या मोहिमेत दोनदा स्पेस वॉक असणार आहे. तसेच या मोहिमेचा उद्देश जपान, अमेरिका, रशिया आणि इतर अंतराळयानांना साहित्य आणि मदत पुरवणं असा आहे.

46 वर्षाच्या सुनीता विल्यम्सचे विक्रमसर्वाधिक प्रदिर्घ अंतराळ प्रवास - 195 दिवससर्वाधिक वेळा अंतराळात तरंगत चालणे - स्पेस वॉक 4 वेळासर्वाधिक काळ स्पेस वॉक - 29 तास 19 मिनिटं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2012 08:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close