S M L

मेहतरांसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणार - मुख्यमंत्री

17 जुलैपंढरपुरात हातानं मैला साफ करणार्‍या मेहतर समाजाचा प्रश्न आज विधानसभेत मांडला गेला. पुरोगामी महाराष्ट्रात इतक्या वर्षांनंतरही ही प्रथा अजून सुरूच कशी असा प्रश्न विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मांडला. यावेळी आयबीएन लोकमतने याबाबत केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेखही खडसेंनी विधानसभेत केला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनंही हा मुद्दा उचलून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली. याबाबत कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी पंढरपुरात हातानं मैला साफ करणार्‍या मेहतर समाजानं आंदोलन केलं आणि त्यांच्या मागण्या आणि अनेक वर्षांचासंघर्ष आयबीएन लोकमतनं महाराष्ट्रापुढे मांडला. त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आश्वासन दिल्यानंतर या समाजाने वारकर्‍यांच्या सोयीसाठी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 17, 2012 09:39 AM IST

मेहतरांसाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणार - मुख्यमंत्री

17 जुलै

पंढरपुरात हातानं मैला साफ करणार्‍या मेहतर समाजाचा प्रश्न आज विधानसभेत मांडला गेला. पुरोगामी महाराष्ट्रात इतक्या वर्षांनंतरही ही प्रथा अजून सुरूच कशी असा प्रश्न विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मांडला. यावेळी आयबीएन लोकमतने याबाबत केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेखही खडसेंनी विधानसभेत केला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसनंही हा मुद्दा उचलून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली. याबाबत कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी पंढरपुरात हातानं मैला साफ करणार्‍या मेहतर समाजानं आंदोलन केलं आणि त्यांच्या मागण्या आणि अनेक वर्षांचासंघर्ष आयबीएन लोकमतनं महाराष्ट्रापुढे मांडला. त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आश्वासन दिल्यानंतर या समाजाने वारकर्‍यांच्या सोयीसाठी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2012 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close