S M L

अण्णा हजारे-खुर्शीद यांची झाली गुप्त बैठक

17 जुलैजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी काँग्रेसचे केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची गुप्त भेट घेतल्याची धक्कादायक माहिती आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहे. शिवसेनेच्या एका खासदारने 23 जुनला पुण्याजवळ या गुप्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक कोणत्या खासदारने घडवली, बैठकीत काय चर्चा झाली याबद्दल कमालीची गुप्तता आहे. या बैठकीबद्दल अण्णांनी भेट झाल्याचं नाकारलं नसून पण स्वीकारायला टाळाटाळ करत आहे. विशेष म्हणजे टीम अण्णांने पंतप्रधानांसह 15 नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. आणि यासाठी दिल्लीत आंदोलनची तयारी केली जात आहे. पण ज्या मंत्र्यांवर टीम अण्णांने भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे त्याच यादीत सलमान खुर्शीद यांचेही नाव आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात लढा पुकारणारे अण्णा हजारे यांनी सलमान खुर्शीद यांची का भेट घेतली असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 17, 2012 10:07 AM IST

अण्णा हजारे-खुर्शीद यांची झाली गुप्त बैठक

17 जुलै

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी काँग्रेसचे केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांची गुप्त भेट घेतल्याची धक्कादायक माहिती आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहे. शिवसेनेच्या एका खासदारने 23 जुनला पुण्याजवळ या गुप्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक कोणत्या खासदारने घडवली, बैठकीत काय चर्चा झाली याबद्दल कमालीची गुप्तता आहे. या बैठकीबद्दल अण्णांनी भेट झाल्याचं नाकारलं नसून पण स्वीकारायला टाळाटाळ करत आहे. विशेष म्हणजे टीम अण्णांने पंतप्रधानांसह 15 नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. आणि यासाठी दिल्लीत आंदोलनची तयारी केली जात आहे. पण ज्या मंत्र्यांवर टीम अण्णांने भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे त्याच यादीत सलमान खुर्शीद यांचेही नाव आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधात लढा पुकारणारे अण्णा हजारे यांनी सलमान खुर्शीद यांची का भेट घेतली असा प्रश्न आता उपस्थित होतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2012 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close