S M L

आपल्याविरोधात निघालेल्या मोर्च्यात उदयनराजेंची एंट्री

17 जुलैखासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात सातार्‍यात आमदार विवेक पंडित यांनी मोर्चा काढला होता. या मोर्च्यात मोठ्याप्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते. उदयनराजे भोसले यांनी कुळांच्या जमिनी परत करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येत होता. मोर्चा रस्त्यात असतांना या मोर्चात अचानक उदयनराजे आणि त्यांचे समर्थक घुसल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर उदयनराजे यांनी या शेतकर्‍यांसमोर स्वत:च भाषण केलं. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विवेक पंडित यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तर पंडित यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 17, 2012 12:26 PM IST

आपल्याविरोधात निघालेल्या मोर्च्यात उदयनराजेंची एंट्री

17 जुलै

खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात सातार्‍यात आमदार विवेक पंडित यांनी मोर्चा काढला होता. या मोर्च्यात मोठ्याप्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होते. उदयनराजे भोसले यांनी कुळांच्या जमिनी परत करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येत होता. मोर्चा रस्त्यात असतांना या मोर्चात अचानक उदयनराजे आणि त्यांचे समर्थक घुसल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर उदयनराजे यांनी या शेतकर्‍यांसमोर स्वत:च भाषण केलं. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी विवेक पंडित यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तर पंडित यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2012 12:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close