S M L

आश्रमशाळेत कोट्यावधींच्या साहित्यांना चढला गंज

16 जुलैनाशिक येथील आश्रमशाळांमधल्या कोट्यावधी रुपयांच्या साधनांचं नेमकं होतं तरी काय हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. आश्रमशाळांसाठी खरेदी करण्यात आलेली जैन सोलार वॉटर हिटर यापैकीच एक आहेत. राज्यातल्या 167 आश्रमशाळांसाठी आणि 33 वस्तीगृहांसाठी याचे 200 संच खरेदी करण्यात आले. विशेष म्हणजे आदिवासी विकास खात्यातर्फे 11 कोटी रुपयांचे पेमेंटही करण्यात आलं. पण यापैकी बहुतांश हिटर्स जमिनीवरच गंजून चालली आहे. हे एकाच साहित्याबाबत असं होत नाही. निधीतून खरेदी करण्यात आलेल्या साधनांचीही कमी नाही. पण प्रत्यक्षात यातील बहुतांश साहित्य आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याच्याच तक्रारी पुढे आल्या आहेत. जिथे पोहोचलंय तिथेही ते कुठे स्टॉक रुममध्ये बंद आहे. तर कुठे अर्धवट सुविधेमुळे गंजून पडलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 16, 2012 11:05 AM IST

आश्रमशाळेत कोट्यावधींच्या साहित्यांना चढला गंज

16 जुलै

नाशिक येथील आश्रमशाळांमधल्या कोट्यावधी रुपयांच्या साधनांचं नेमकं होतं तरी काय हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. आश्रमशाळांसाठी खरेदी करण्यात आलेली जैन सोलार वॉटर हिटर यापैकीच एक आहेत. राज्यातल्या 167 आश्रमशाळांसाठी आणि 33 वस्तीगृहांसाठी याचे 200 संच खरेदी करण्यात आले. विशेष म्हणजे आदिवासी विकास खात्यातर्फे 11 कोटी रुपयांचे पेमेंटही करण्यात आलं. पण यापैकी बहुतांश हिटर्स जमिनीवरच गंजून चालली आहे. हे एकाच साहित्याबाबत असं होत नाही. निधीतून खरेदी करण्यात आलेल्या साधनांचीही कमी नाही. पण प्रत्यक्षात यातील बहुतांश साहित्य आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याच्याच तक्रारी पुढे आल्या आहेत. जिथे पोहोचलंय तिथेही ते कुठे स्टॉक रुममध्ये बंद आहे. तर कुठे अर्धवट सुविधेमुळे गंजून पडलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2012 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close