S M L

गैरहजर राहिली म्हणून विद्यार्थिनीला कपडे उतरवण्याची शिक्षा

16 जुलैवर्गात गैरहजर राहिल्याच्या कारणावरून तिसर्‍या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थिनीला भर वर्गात कपडे उतरवण्याची शिक्षा केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात घडला आहे. याप्रकरणी पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर शिक्षिका वायसे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. शहरातील कवीवर्य मोरोपंत शिक्षण संस्थेच्या अमराईतल्या शाळेत हा प्रकार घडला. बुधवारी वर्गात गैरहजर राहिल्यामुळे शिक्षिका वायसे यांनी या मुलीसह तीन मुली आणि तीन मुलांना भर वर्गात कपडे उतरवण्याची शिक्षा केली. संध्याकाळी ही मुलगी घरी पोहचल्यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी झालेला प्रकार मुलीचा आईला सांगितला. याबद्दल शिक्षिकेला जाब विचारला असता 'तुम्ही मोठ्या मॅडमला विचारा,माझ्याशी बोलू नका' असं उत्तर वायसे यांनी दिलं. अखेर पालकांनी झालेल्या प्रकारबद्दल पोलिसांत तक्रार केली असता शिक्षिका वायसेला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणाबद्दल सोमवारी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत शिक्षिकेवर कारवाईचा निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येतंय. तसेच बारामतीच्या डोर्लेवाडी या गावात गेल्या वर्षभरापासून प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक दोन विद्यार्थ्यांकडून स्वच्छतागृह साफ करुन घेत असल्याचं उघड झालं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 16, 2012 12:06 PM IST

गैरहजर राहिली म्हणून विद्यार्थिनीला कपडे उतरवण्याची शिक्षा

16 जुलै

वर्गात गैरहजर राहिल्याच्या कारणावरून तिसर्‍या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थिनीला भर वर्गात कपडे उतरवण्याची शिक्षा केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात घडला आहे. याप्रकरणी पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर शिक्षिका वायसे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय.

शहरातील कवीवर्य मोरोपंत शिक्षण संस्थेच्या अमराईतल्या शाळेत हा प्रकार घडला. बुधवारी वर्गात गैरहजर राहिल्यामुळे शिक्षिका वायसे यांनी या मुलीसह तीन मुली आणि तीन मुलांना भर वर्गात कपडे उतरवण्याची शिक्षा केली. संध्याकाळी ही मुलगी घरी पोहचल्यानंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी झालेला प्रकार मुलीचा आईला सांगितला.

याबद्दल शिक्षिकेला जाब विचारला असता 'तुम्ही मोठ्या मॅडमला विचारा,माझ्याशी बोलू नका' असं उत्तर वायसे यांनी दिलं. अखेर पालकांनी झालेल्या प्रकारबद्दल पोलिसांत तक्रार केली असता शिक्षिका वायसेला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणाबद्दल सोमवारी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत शिक्षिकेवर कारवाईचा निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येतंय. तसेच बारामतीच्या डोर्लेवाडी या गावात गेल्या वर्षभरापासून प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक दोन विद्यार्थ्यांकडून स्वच्छतागृह साफ करुन घेत असल्याचं उघड झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2012 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close