S M L

उध्दव यांना डिस्चार्ज

16 जुलैशिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांना आज संध्याकाळी सहावा वाजता लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. उध्दव यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टारांनी मेडिकल बुलेटिन घेऊन उध्दव यांना डिस्चार्ज दिला आहे. यावेळी राज ठाकरे उपस्थिती होते. हॉस्पिटल बाहेर आल्यानंतर उध्दव यांनी हात उंचावत मी ठीक असल्याचं सांगत सर्वांना अभिवादन केला. यानंतर स्वत: राज ठाकरे उध्दव यांची कार चालवत होते आणि उध्दव शेजारील सीटवर बसले होते. यानंतर राज-उध्दव एकत्र मातोश्रीवर दाखल झाले . काल रात्री उध्दव ठाकरे यांना छातीत दुखू लागल्यामुळे आज सकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उध्दव यांच्यावर दुपारी अँजिओग्राफी करण्यात आली. प्रकृती स्थिर असल्यामुळे संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली तमाम शिवसैनिकांनी हॉस्पिटलबाहेर एकच गर्दी केली. महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांनी फोन करून उध्दव यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फोन करुन उध्दव यांच्या तब्येतीची विचारणा केली. तर या सगळ्यांपेक्षा जवळचे नाते पण राजकीय मतभेदामुळे गेल्या साडेतीन ते चार वर्षापासून दुरावलेले सख्खे चुलत भाऊ राज ठाकरेही उध्दव यांच्या तब्येतीमुळे अस्वस्थ झाले. राजकीय मतभेद विसरून राज यांनी आपला अलिबागचा दौरा अर्ध्यावर आटोपून मुंबईकडे रवाना झाले. दुपारी राज यांनी उध्दव यांची भेट घेतली. आजाराच्या निमित्ताने का म्हणावं राज-उध्दव यांची भेट संपूर्ण महाराष्ट्राला सुखद धक्का देणारी होती. यावेळी राज यांचे कुटुंबीयही सोबत होते. अशा नाजूक परिस्थिती उध्दव यांच्या पाठिशी राज खंबीरपणे उभे राहिले. राज यांनी डॉक्टरांची भेट घेतली. उध्दव यांना नेमक काय झालंय ? काय उपचार होणार आहे ? डिस्चार्ज कधी मिळणार ? अशा अनेक प्रश्नाची चौकशी केली. दुपारी भेट झाल्यानंतर संध्याकाळी साडेचारच्या सुमारास राज पुन्हा एकदा लीलावतीमध्ये पोहचले. पुन्हा एकदा डॉक्टरांची भेट घेऊन तब्येतीबद्दल विचारणा केली. उध्दव यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगत डॉक्टरांनी उध्दव यांना डिस्चार्ज दिला. हॉस्पिटलबाहेर शिवसैनिक-मनसेसैनिकांनी एकच गर्दी केली होती. राज-उध्दव यांच्या भेटीमुळे कार्यकर्तेही एकमेकात मिसळून गेले होते. उध्दव यांना घेऊन राज स्वत हॉस्पिटलबाहेर आले. काळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या पट्टेदार टी-शर्ट घातलेले उध्दव ठाकरे हॉस्पिटल बाहेर आले. मी ठीक असल्याचं सांगत सर्वांना हात उंचावून उध्दव यांनी सर्वांना अभिवादन केलं. यानंतर उध्दव यांच्या मर्सिडीज कारमध्ये राज-उध्दव एकत्र बसले. यावेळी राज ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. तर उध्दव शेजारील सीटवर बसले होते. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून वाट काढत राज-उध्दव मातोश्रीकडे रवाना झाले. मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर राज-उध्दव यांनी कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केला. माध्यमांचे आभार मानत मातोश्रीत प्रवेश केला. एकंदरीतच आजरापणाच्या निमित्तामुळे राज-उध्दव यांची भेट राजकारणापलीकडे होती. राजकारणापेक्षाही रक्ताचे नाते श्रेष्ठ असते ते हेच..

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 16, 2012 12:46 PM IST

उध्दव यांना डिस्चार्ज

16 जुलै

शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांना आज संध्याकाळी सहावा वाजता लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. उध्दव यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टारांनी मेडिकल बुलेटिन घेऊन उध्दव यांना डिस्चार्ज दिला आहे. यावेळी राज ठाकरे उपस्थिती होते. हॉस्पिटल बाहेर आल्यानंतर उध्दव यांनी हात उंचावत मी ठीक असल्याचं सांगत सर्वांना अभिवादन केला. यानंतर स्वत: राज ठाकरे उध्दव यांची कार चालवत होते आणि उध्दव शेजारील सीटवर बसले होते. यानंतर राज-उध्दव एकत्र मातोश्रीवर दाखल झाले .

काल रात्री उध्दव ठाकरे यांना छातीत दुखू लागल्यामुळे आज सकाळी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उध्दव यांच्यावर दुपारी अँजिओग्राफी करण्यात आली. प्रकृती स्थिर असल्यामुळे संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली तमाम शिवसैनिकांनी हॉस्पिटलबाहेर एकच गर्दी केली.

महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांनी फोन करून उध्दव यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फोन करुन उध्दव यांच्या तब्येतीची विचारणा केली. तर या सगळ्यांपेक्षा जवळचे नाते पण राजकीय मतभेदामुळे गेल्या साडेतीन ते चार वर्षापासून दुरावलेले सख्खे चुलत भाऊ राज ठाकरेही उध्दव यांच्या तब्येतीमुळे अस्वस्थ झाले. राजकीय मतभेद विसरून राज यांनी आपला अलिबागचा दौरा अर्ध्यावर आटोपून मुंबईकडे रवाना झाले. दुपारी राज यांनी उध्दव यांची भेट घेतली. आजाराच्या निमित्ताने का म्हणावं राज-उध्दव यांची भेट संपूर्ण महाराष्ट्राला सुखद धक्का देणारी होती. यावेळी राज यांचे कुटुंबीयही सोबत होते.

अशा नाजूक परिस्थिती उध्दव यांच्या पाठिशी राज खंबीरपणे उभे राहिले. राज यांनी डॉक्टरांची भेट घेतली. उध्दव यांना नेमक काय झालंय ? काय उपचार होणार आहे ? डिस्चार्ज कधी मिळणार ? अशा अनेक प्रश्नाची चौकशी केली. दुपारी भेट झाल्यानंतर संध्याकाळी साडेचारच्या सुमारास राज पुन्हा एकदा लीलावतीमध्ये पोहचले. पुन्हा एकदा डॉक्टरांची भेट घेऊन तब्येतीबद्दल विचारणा केली. उध्दव यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगत डॉक्टरांनी उध्दव यांना डिस्चार्ज दिला. हॉस्पिटलबाहेर शिवसैनिक-मनसेसैनिकांनी एकच गर्दी केली होती. राज-उध्दव यांच्या भेटीमुळे कार्यकर्तेही एकमेकात मिसळून गेले होते.

उध्दव यांना घेऊन राज स्वत हॉस्पिटलबाहेर आले. काळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या पट्टेदार टी-शर्ट घातलेले उध्दव ठाकरे हॉस्पिटल बाहेर आले. मी ठीक असल्याचं सांगत सर्वांना हात उंचावून उध्दव यांनी सर्वांना अभिवादन केलं. यानंतर उध्दव यांच्या मर्सिडीज कारमध्ये राज-उध्दव एकत्र बसले. यावेळी राज ठाकरे स्वत: गाडी चालवत होते. तर उध्दव शेजारील सीटवर बसले होते. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून वाट काढत राज-उध्दव मातोश्रीकडे रवाना झाले. मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर राज-उध्दव यांनी कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केला. माध्यमांचे आभार मानत मातोश्रीत प्रवेश केला. एकंदरीतच आजरापणाच्या निमित्तामुळे राज-उध्दव यांची भेट राजकारणापलीकडे होती. राजकारणापेक्षाही रक्ताचे नाते श्रेष्ठ असते ते हेच..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2012 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close