S M L

महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटांवरुन छगन भुजबळ अडचणीत

अमेय तिरोडकरसह अलका धुपकर, मुंबई19 जुलैदिल्लीमध्ये बांधण्यात येत असलेल्या महाराष्ट्र सदनाच्या नव्या इमारतीचं बांधकाम पूर्ण होतं आलं आहे. पण या बांधकामासाठी दिलेल्या कंत्राटांवरुन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हे पुन्हा एकदा वादात सापडले आहे. मंत्रीपदी असताना छगन भुजबळ यांच्या नातलगांना या कंत्राटांचा लाभ कसा मिळाला, असा प्रश्न यातून उभा होतोय. नोव्हेंबर 2006 मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला. 16,000 चौरसमीटर जागेवर दिल्लीतील महाराष्ट्र सदनची नवी इमारत बांधण्याचा...डिसेंबर 2006 मध्ये केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या इमारतीची पायाभरणीही झाली. के. एस. चमणकर यांना बांधकामाचं हे कंत्राट 52 कोटी रुपयांना देण्यात आलं होतं. आता या बांधकामाची किंमत 150 कोटीवर पोहचली आहे. कस्तुरबा गांधी मार्गावर उभ्या राहिलेल्या या प्रशस्त इमारतीचं कोडकौतुक होण्याआधीच त्याची कंत्राटं वादात सापडली आहेत.सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या खात्याअंतर्गतच महाराष्ट्र सदनाचा प्रकल्प सुरु आहे. आणि या संपूर्ण व्यवहारात स्वत: भुजबळ यांच्याच नातलगांना उपकंत्राटं देण्यात आली आहेत. त्यामुळे हा सगळा प्रकार प्रॉफिट ऑफ ऑफिस ??? ऑफिस ऑफ प्रॉफिट???? असल्याचा आरोप करण्यात आला आहे.छगन भुजबळ यांनी हे आरोप फेटाळलेत. पण नातलगांना उपकंत्राटं मिळाल्याचं मात्र ते नाकारत नाही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र सदनाचा हा वाद आता तपास यंत्रणाच्या चौकशीनंतरच मिटू शकेल. कंत्राटाचे वाटपके. एस. चमणकर (कंत्राटदार)ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर (भुजबळांच्या सहकार्‍यांची कंपनी)आयडीन फर्निचर भुजबळांच्या सुनांची कंपनी)प्राईम बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स (धनपत सेठ यांची कंपनी)रॉयल एंटरप्रायझेस (धनपत सेठ यांची दुसरी कंपनी)निचे (NICHE) इन्फ्र ास्ट्रक्चर (संचालक: समीर आणि पंकज भुजबळ)

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2012 09:54 AM IST

महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटांवरुन छगन भुजबळ अडचणीत

अमेय तिरोडकरसह अलका धुपकर, मुंबई19 जुलै

दिल्लीमध्ये बांधण्यात येत असलेल्या महाराष्ट्र सदनाच्या नव्या इमारतीचं बांधकाम पूर्ण होतं आलं आहे. पण या बांधकामासाठी दिलेल्या कंत्राटांवरुन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हे पुन्हा एकदा वादात सापडले आहे. मंत्रीपदी असताना छगन भुजबळ यांच्या नातलगांना या कंत्राटांचा लाभ कसा मिळाला, असा प्रश्न यातून उभा होतोय.

नोव्हेंबर 2006 मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने एक महत्वाचा निर्णय घेतला. 16,000 चौरसमीटर जागेवर दिल्लीतील महाराष्ट्र सदनची नवी इमारत बांधण्याचा...डिसेंबर 2006 मध्ये केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या इमारतीची पायाभरणीही झाली. के. एस. चमणकर यांना बांधकामाचं हे कंत्राट 52 कोटी रुपयांना देण्यात आलं होतं. आता या बांधकामाची किंमत 150 कोटीवर पोहचली आहे. कस्तुरबा गांधी मार्गावर उभ्या राहिलेल्या या प्रशस्त इमारतीचं कोडकौतुक होण्याआधीच त्याची कंत्राटं वादात सापडली आहेत.सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या खात्याअंतर्गतच महाराष्ट्र सदनाचा प्रकल्प सुरु आहे. आणि या संपूर्ण व्यवहारात स्वत: भुजबळ यांच्याच नातलगांना उपकंत्राटं देण्यात आली आहेत. त्यामुळे हा सगळा प्रकार प्रॉफिट ऑफ ऑफिस ??? ऑफिस ऑफ प्रॉफिट???? असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

छगन भुजबळ यांनी हे आरोप फेटाळलेत. पण नातलगांना उपकंत्राटं मिळाल्याचं मात्र ते नाकारत नाही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र सदनाचा हा वाद आता तपास यंत्रणाच्या चौकशीनंतरच मिटू शकेल. कंत्राटाचे वाटप

के. एस. चमणकर (कंत्राटदार)ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर (भुजबळांच्या सहकार्‍यांची कंपनी)आयडीन फर्निचर भुजबळांच्या सुनांची कंपनी)प्राईम बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स (धनपत सेठ यांची कंपनी)रॉयल एंटरप्रायझेस (धनपत सेठ यांची दुसरी कंपनी)निचे (NICHE) इन्फ्र ास्ट्रक्चर (संचालक: समीर आणि पंकज भुजबळ)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2012 09:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close