S M L

पवारांनी दिला राजीनाम्याचा इशारा

19 जुलैकेंद्रातल्या यूपीए सराकारसमोर नवं संकट उभं ठाकलं आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारमधून राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्यापाठोपाठ प्रफुल्ल पटेलही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागिल कॅबिनेट बैठकीमध्ये नंबर दोनचं स्थान न दिल्यामुळे नाराज पवारांनी राजीनामा देण्यास तयार असल्याची माहिती आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत पवार गैरहजर राहिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला आज सलग दुसर्‍यांदा पवार गैरहजर राहिले आहे. प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानांच्या शेजारचे स्थान शरद पवार यांना देण्यात यावे अशी अपेक्षा राष्ट्रवादीला होती पण असे होऊ शकले नाही काँग्रेसने ती जागा ए के अँटनी यांना देण्यात आली. त्यामुळे शरद पवार नाराज झाले. त्यामुळेच आजच्या कॅबिनेट बैठकीत पवार गैरहजर राहिले. या प्रकरणामुळे कॅबिनेटमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. तसेच यापुढे सोबत असलो तरी बाहेरुन पाठिंबा देणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2012 03:40 PM IST

पवारांनी दिला राजीनाम्याचा इशारा

19 जुलै

केंद्रातल्या यूपीए सराकारसमोर नवं संकट उभं ठाकलं आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारमधून राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्यापाठोपाठ प्रफुल्ल पटेलही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागिल कॅबिनेट बैठकीमध्ये नंबर दोनचं स्थान न दिल्यामुळे नाराज पवारांनी राजीनामा देण्यास तयार असल्याची माहिती आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत पवार गैरहजर राहिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला आज सलग दुसर्‍यांदा पवार गैरहजर राहिले आहे. प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानांच्या शेजारचे स्थान शरद पवार यांना देण्यात यावे अशी अपेक्षा राष्ट्रवादीला होती पण असे होऊ शकले नाही काँग्रेसने ती जागा ए के अँटनी यांना देण्यात आली. त्यामुळे शरद पवार नाराज झाले. त्यामुळेच आजच्या कॅबिनेट बैठकीत पवार गैरहजर राहिले. या प्रकरणामुळे कॅबिनेटमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. तसेच यापुढे सोबत असलो तरी बाहेरुन पाठिंबा देणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2012 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close