S M L

पिंपरी-चिंचवडमध्ये बंधार्‍यातून लाखो लिटर पाणी वाया

19 जुलैपिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातील बांधकामांच्या पाणी वापरावर बंदी घातली. पण पाणी वाटपाच्या नियोजनाबाबत महापालिकेकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पाणी पुरवठा करणार्‍या बंधार्‍यातून लाखो लिटर पाणी वाया जातंय हे माहित असूनही पालिका त्याकडे दुर्लक्षच करतेय. पिंपरी-चिंचवड शहराला रावेत बंधार्‍यातून दररोज 450 एलएमडी पाणी पुरवलं जातं. पण याच बंधार्‍यातून लाखो लिटर पाणी नदीपात्रातही सोडलं जातं. ते कुणासाठी आणि का सोडलं जातं याबाबत पालिकेकडून कुणीही बोलायला तयार नाही. शहरात तब्बल 30 ठिकाणी पाणीगळती होत असल्याची धक्कादायक माहिती स्वत: महापौरांनीच दिलीये. पण त्यावर उपययोजना काय करणार यावर मात्र ते निरूत्तर होते. महापालिकेकडून होणार्‍या पाणीवाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे. गळतीच्या नावावर दुर्लक्ष केलेलं पाणी बांधकाम व्यावसायिक असलेल्या लोकप्रतिनिधींच्या बांधकामांसाठी वापरलं जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2012 05:05 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये बंधार्‍यातून लाखो लिटर पाणी वाया

19 जुलै

पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातील बांधकामांच्या पाणी वापरावर बंदी घातली. पण पाणी वाटपाच्या नियोजनाबाबत महापालिकेकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पाणी पुरवठा करणार्‍या बंधार्‍यातून लाखो लिटर पाणी वाया जातंय हे माहित असूनही पालिका त्याकडे दुर्लक्षच करतेय. पिंपरी-चिंचवड शहराला रावेत बंधार्‍यातून दररोज 450 एलएमडी पाणी पुरवलं जातं. पण याच बंधार्‍यातून लाखो लिटर पाणी नदीपात्रातही सोडलं जातं. ते कुणासाठी आणि का सोडलं जातं याबाबत पालिकेकडून कुणीही बोलायला तयार नाही. शहरात तब्बल 30 ठिकाणी पाणीगळती होत असल्याची धक्कादायक माहिती स्वत: महापौरांनीच दिलीये. पण त्यावर उपययोजना काय करणार यावर मात्र ते निरूत्तर होते. महापालिकेकडून होणार्‍या पाणीवाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांनी केला आहे. गळतीच्या नावावर दुर्लक्ष केलेलं पाणी बांधकाम व्यावसायिक असलेल्या लोकप्रतिनिधींच्या बांधकामांसाठी वापरलं जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2012 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close