S M L

कसार्‍याजवळ विदर्भ एक्स्प्रेस लोकलवर धडकली, 1 ठार

19 जुलैकसार्‍याजवळ विदर्भ एक्सप्रेसला झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झालेत. त्यापैकी एकाची प्रकृतीगंभीर आहे. काल रात्री साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. सार्‍याजवळ कसार्‍याहून कल्याणकडे जाणार्‍या लोकलवर दरड कोसळलीहोती. त्यामुळे या लोकलचे काही डबे रुळावरुन घसरले. त्याचवेळी मुंबईहून नागपूरकडे जाणारी विदर्भ एक्सप्रेस येत होती. लोकलचे घसरलेले डबे पाहून एक्सप्रेसच्या ड्रायव्हरनं इमरजन्सी ब्रेक लावले पण एक्सप्रेस लोकलला धडकली. यामुळे एक्सप्रेसचे एक डबा दुसर्‍या डब्यावर चढल्यानं अपघात झाला. पण वेग कमी झाल्यानं मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आलीये. तर जखमींना 1 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. काही जखमींना नाशिकला तर काहींना कसार्‍याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमीट करण्यात आलंय. या अपघातानंतर दुरूस्तीचं काम तीन टप्प्यात केलं जाणार आहे. सगळ्यात आधी लोकल आणि विदर्भ एक्सप्रेसचे इंजिन बाजूला केलं जाणार आहे. त्यानंतर ट्रॅकची सुधारणा केली जाणार आहे. त्यानंतर ओव्हरहेड वायर दुरूस्त केली जाईल. या कामाला 24 तास लागणार आहेत. तोपर्यंत सर्व लोकल या आसनगाव स्टेशनपर्यंतच धावणार आहेत. तर लांब पल्ल्याचा एक्सप्रेस इतर मार्गानं वळवण्यात आल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2012 06:29 PM IST

कसार्‍याजवळ विदर्भ एक्स्प्रेस लोकलवर धडकली, 1 ठार

19 जुलै

कसार्‍याजवळ विदर्भ एक्सप्रेसला झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झालेत. त्यापैकी एकाची प्रकृतीगंभीर आहे. काल रात्री साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. सार्‍याजवळ कसार्‍याहून कल्याणकडे जाणार्‍या लोकलवर दरड कोसळलीहोती. त्यामुळे या लोकलचे काही डबे रुळावरुन घसरले. त्याचवेळी मुंबईहून नागपूरकडे जाणारी विदर्भ एक्सप्रेस येत होती.

लोकलचे घसरलेले डबे पाहून एक्सप्रेसच्या ड्रायव्हरनं इमरजन्सी ब्रेक लावले पण एक्सप्रेस लोकलला धडकली. यामुळे एक्सप्रेसचे एक डबा दुसर्‍या डब्यावर चढल्यानं अपघात झाला. पण वेग कमी झाल्यानं मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आलीये. तर जखमींना 1 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. काही जखमींना नाशिकला तर काहींना कसार्‍याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमीट करण्यात आलंय. या अपघातानंतर दुरूस्तीचं काम तीन टप्प्यात केलं जाणार आहे. सगळ्यात आधी लोकल आणि विदर्भ एक्सप्रेसचे इंजिन बाजूला केलं जाणार आहे. त्यानंतर ट्रॅकची सुधारणा केली जाणार आहे. त्यानंतर ओव्हरहेड वायर दुरूस्त केली जाईल. या कामाला 24 तास लागणार आहेत. तोपर्यंत सर्व लोकल या आसनगाव स्टेशनपर्यंतच धावणार आहेत. तर लांब पल्ल्याचा एक्सप्रेस इतर मार्गानं वळवण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2012 06:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close