S M L

भारताने पाचवी वनडे जिंकली

26 नोव्हेंबर कटकभारतानं इंग्लंडविरुद्धची पाचवी वन डे दिमाखात जिंकली. विजयासाठीचं 271 रन्सचं टार्गेट भारतानं 6 विकेट राखून पार केलं.सेहवाग आणि सचिन यांनी 136 रन्सची ओपनिंग भारताला करून दिली. दोघांनी हाफ सेंच्युरी ठोकली.सचिनची वन डे क्रिकेटमधली ही 90वी हाफ सेंच्युरी.सचिन आऊट झाल्यावर दुस-या बाजूने सेहवागही आक्रमक खेळ सुरूच ठेवला. पण सेंच्युरीला 9 रन्स हवे असताना ब्रॉडच्या बॉलिंगवर तो एल बी डब्ल्यू झाला. त्याने 73 बॉल्समध्ये 91 रन्स करताना एक सिक्स आणि तब्बल पंधरा फोर लगावले. सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेला युवराज सिंग 6 रन्स करून लगेच आऊट झाला. त्यानंतर धोणी आणि रैना यांनी हाफ सेंच्युरी झळकावत भारताला शानदार विजय मिळवून दिला.सात वनडेच्या सीरिजमध्ये भारतानं आता 5-0 अशी आघाडी घेतली आहे.मॅन ऑफ द मॅच विरेंद्र सेहवागला देण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2008 06:26 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2008 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close