S M L

उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी यशस्वी; रविवारी डिस्चार्ज

20 जुलैशिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंना आयसीयू (ICU) मध्ये हलवण्यात आलंय.जवळपास अडीत तास हे ऑपरेशन सुरु होतं. डॉ सम्युयल मॅथू आणि त्यांच्या टीमनं ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. आज आणि उद्या शनिवारी उध्दव यांना हॉस्पिटलमध्ये राहणार आहे. त्यानंतर रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय.उद्धव ठाकरेंच्या ऑपरेशन दरम्यान राज ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंबीय हजर होते. काल गुरुवारी संध्याकाळी राज यांनी उध्दव यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेतली होती. आज सकाळी उध्दव यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं यावेळी राज यांच्यासह ठाकरे कुटुंबीय हजर होते. उध्दव यांच्या छातीमध्ये तीन ब्लॉक्स आढळून आले होते. उध्दव यांनी बायपास सर्जरी करावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण उध्दव यांनी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर रुग्णाला कमीकमीत दोन दिवस बेडरेस्ट घ्यावाच लागतो दोन दिवसांनंतर रुग्ण पूर्ण बरा होऊन दुसर्‍यादिवशी कामाला लागू शकतो. त्यामुळे उध्दव यांनी रविवारी संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळू शकतो. दरम्यान, उध्दव यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची तब्येत ठीक आहे अशी माहिती मनोहर जोशी यांनी पत्रकारांना दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 20, 2012 09:38 AM IST

उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी यशस्वी; रविवारी डिस्चार्ज

20 जुलै

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंना आयसीयू (ICU) मध्ये हलवण्यात आलंय.जवळपास अडीत तास हे ऑपरेशन सुरु होतं. डॉ सम्युयल मॅथू आणि त्यांच्या टीमनं ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. आज आणि उद्या शनिवारी उध्दव यांना हॉस्पिटलमध्ये राहणार आहे. त्यानंतर रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय.उद्धव ठाकरेंच्या ऑपरेशन दरम्यान राज ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंबीय हजर होते.

काल गुरुवारी संध्याकाळी राज यांनी उध्दव यांच्या प्रकृतीची विचारपुस करण्यासाठी मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेतली होती. आज सकाळी उध्दव यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं यावेळी राज यांच्यासह ठाकरे कुटुंबीय हजर होते. उध्दव यांच्या छातीमध्ये तीन ब्लॉक्स आढळून आले होते. उध्दव यांनी बायपास सर्जरी करावी असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण उध्दव यांनी अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर रुग्णाला कमीकमीत दोन दिवस बेडरेस्ट घ्यावाच लागतो दोन दिवसांनंतर रुग्ण पूर्ण बरा होऊन दुसर्‍यादिवशी कामाला लागू शकतो. त्यामुळे उध्दव यांनी रविवारी संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळू शकतो. दरम्यान, उध्दव यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची तब्येत ठीक आहे अशी माहिती मनोहर जोशी यांनी पत्रकारांना दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2012 09:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close