S M L

पवारांच्या मनधरनीसाठी पंतप्रधानांनी साधला संपर्क

20 जुलैराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराज दूर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरु आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पवारांशी संपर्क साधला. पवार हे आघाडीचे महत्त्वाचे सहकारी आहे त्यांच्या अनुभवाचा सरकारला फायदा आहे असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. काँग्रेसनं दिलेल्या फॉर्म्युल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना, राष्ट्रवादी अजूनही काही मुद्यांवर नाराज असल्याचं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं. शरद पवारांनी पंतप्रधानांशी आपल्या नाराजीबाबत चर्चा केल्याचंही पटेल यांनी सांगितलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून कुणीही औपचारीक राजीनामा दिलेला नाही. हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान, काँग्रेसमधल्या एका गटाकडून शरद पवारांबाबत सातत्यानं अपप्रचार केला जात असल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 20, 2012 09:52 AM IST

पवारांच्या मनधरनीसाठी पंतप्रधानांनी साधला संपर्क

20 जुलै

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराज दूर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरु आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पवारांशी संपर्क साधला. पवार हे आघाडीचे महत्त्वाचे सहकारी आहे त्यांच्या अनुभवाचा सरकारला फायदा आहे असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. काँग्रेसनं दिलेल्या फॉर्म्युल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना, राष्ट्रवादी अजूनही काही मुद्यांवर नाराज असल्याचं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं. शरद पवारांनी पंतप्रधानांशी आपल्या नाराजीबाबत चर्चा केल्याचंही पटेल यांनी सांगितलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून कुणीही औपचारीक राजीनामा दिलेला नाही. हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. दरम्यान, काँग्रेसमधल्या एका गटाकडून शरद पवारांबाबत सातत्यानं अपप्रचार केला जात असल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2012 09:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close