S M L

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला दरीत ढकलले

21 जुलैहुंड्याच्या मागणी आणि चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीला दोन हजार फूट खोल दरीत ढकलून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती विक्रम शेवते, सासरे शंकर शेवते, सासु अलका शेवते यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुनीताचे वडिल नारायण कुदळे यांनी पोलीसांत तक्रार दिल्यानंतर तपासात हा प्रकार उघड झाला. याबाबतची हकीकत अशी, सुनीता हिला दोन मुली आहे. तिचं माहेर ही शेजारील हांडेवाडी येथील आहे.तिचं एका तरुणांशी प्रेमसंबंध असल्याचा संशय विक्रमला होता. संशयाचे भूत मानगुटीवर बसल्यानंतर सुनीताचा काटा काढण्याचं विक्रमने ठरवलं. 13 जुलैला आपल्याला पुण्यात दागिने खरेदीसाठी जायचे आहे असं सांगून सुनीताला वंधार घाट फिरायला नेले. पावसात भिजायचं नाटक केलं. यानंतर तिला काही कळायच्या आतच घाटाच्या एका टोकावून सुनीताला 20 फूट खोल दरीत ढकलून दिलं. काही झालंच नाही असा आव आणत विक्रम घरी परतला. रात्र झाली तरी मुलगी घरी येत नसल्यामुळे सुनीताचे वडील नारायण कुदळे यांनी शोधाशोध सुरु केला. विक्रमकडे चौकशी केली असता मला काही माहित नाही असा सुर त्यांने लगावला. नातेवाईकांकडे विचारपुस केली पण काहीच पत्ता लागत नसल्यामुळे पुन्हा एकदा कुदळे यांनी विक्रमकडे विचारपुस केली. दोघांत बाचाबाची झाली. रागाच्या भरात विक्रमने मीच तिचा खून केला असं सांगितलं. कुदळे यांनी याबद्दल तातडीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. विक्रमनेच आपल्यामुलीचा खून केल्याचा दाव केला. पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेतलं. प्राथमिक तपासात विक्रमने उडवाउडवीची उत्तर दिली. अखेर पोलिसी खाक्याचा हिसका दाखवताचा विक्रमने खूनाची कबुली दिली. ज्या ठिकाणाहून सुनीताला ढकलले त्या ठिकाणी पोलिसांनी गिर्यारोहण संस्थेच्या मदतीने सुनीताचा मृतदेह बाहेर काढला. विक्रमला न्यायालयासमोर हजर केले असता कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 21, 2012 10:22 AM IST

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला दरीत ढकलले

21 जुलै

हुंड्याच्या मागणी आणि चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीला दोन हजार फूट खोल दरीत ढकलून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती विक्रम शेवते, सासरे शंकर शेवते, सासु अलका शेवते यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सुनीताचे वडिल नारायण कुदळे यांनी पोलीसांत तक्रार दिल्यानंतर तपासात हा प्रकार उघड झाला.

याबाबतची हकीकत अशी, सुनीता हिला दोन मुली आहे. तिचं माहेर ही शेजारील हांडेवाडी येथील आहे.तिचं एका तरुणांशी प्रेमसंबंध असल्याचा संशय विक्रमला होता. संशयाचे भूत मानगुटीवर बसल्यानंतर सुनीताचा काटा काढण्याचं विक्रमने ठरवलं. 13 जुलैला आपल्याला पुण्यात दागिने खरेदीसाठी जायचे आहे असं सांगून सुनीताला वंधार घाट फिरायला नेले. पावसात भिजायचं नाटक केलं. यानंतर तिला काही कळायच्या आतच घाटाच्या एका टोकावून सुनीताला 20 फूट खोल दरीत ढकलून दिलं. काही झालंच नाही असा आव आणत विक्रम घरी परतला.

रात्र झाली तरी मुलगी घरी येत नसल्यामुळे सुनीताचे वडील नारायण कुदळे यांनी शोधाशोध सुरु केला. विक्रमकडे चौकशी केली असता मला काही माहित नाही असा सुर त्यांने लगावला. नातेवाईकांकडे विचारपुस केली पण काहीच पत्ता लागत नसल्यामुळे पुन्हा एकदा कुदळे यांनी विक्रमकडे विचारपुस केली. दोघांत बाचाबाची झाली. रागाच्या भरात विक्रमने मीच तिचा खून केला असं सांगितलं. कुदळे यांनी याबद्दल तातडीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. विक्रमनेच आपल्यामुलीचा खून केल्याचा दाव केला. पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेतलं. प्राथमिक तपासात विक्रमने उडवाउडवीची उत्तर दिली. अखेर पोलिसी खाक्याचा हिसका दाखवताचा विक्रमने खूनाची कबुली दिली. ज्या ठिकाणाहून सुनीताला ढकलले त्या ठिकाणी पोलिसांनी गिर्यारोहण संस्थेच्या मदतीने सुनीताचा मृतदेह बाहेर काढला. विक्रमला न्यायालयासमोर हजर केले असता कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2012 10:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close