S M L

मोटरमनच्या संपामुळे रेल्वेमधून पडून महिलेचा मृत्यू

21 जुलैकाल शुक्रवारी पश्चिम रेल्वेच्या मोटरमनचा संप झाल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. याच संपामुळे प्रचंड गर्दी झाली आणि या गर्दीत प्रवास करणार्‍या पालघरच्या रीना कुलकर्णी यांचा रेल्वेमधून पडून मृत्यू झाला. फ्लाईंग राणी या गाडीखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. मोटरमन्सनी जर संप केला नसता तर आमची रीना सुखरुप घरी परतली असती पण या संपामुळे ही घटना घडल्याचा रीनाच्या नातेवाईकांनी आरोप केला. शुक्रवारी ऐन संध्याकाळी 180 मोटारमन अचानक कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे मुंबईकरांचे पुरते हाल झाले. चर्चगेट,दादर स्थानकावरुन एकच गर्दी उसळली होती. संध्याकाळी 7 :30 च्या सुमाराला आंदोलन मागे घेण्यात आले पण रेल्वे तुडुंब भरून वाहत होत्या. अशाच एका तुडुंब भरलेल्या रेल्वेतून रीना कुलकर्णी ह्या प्रवास करत होत्या. बोरीवली स्टेशनजवळ रेल्वेमधून रीना यांचा तोल गेला. शेजारच्या ट्रकवरुन येणारी फ्लाईंग राणी या गाडीखाली त्यांचा दुदैर्वी मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 21, 2012 02:24 PM IST

मोटरमनच्या संपामुळे रेल्वेमधून पडून महिलेचा मृत्यू

21 जुलै

काल शुक्रवारी पश्चिम रेल्वेच्या मोटरमनचा संप झाल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. याच संपामुळे प्रचंड गर्दी झाली आणि या गर्दीत प्रवास करणार्‍या पालघरच्या रीना कुलकर्णी यांचा रेल्वेमधून पडून मृत्यू झाला. फ्लाईंग राणी या गाडीखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. मोटरमन्सनी जर संप केला नसता तर आमची रीना सुखरुप घरी परतली असती पण या संपामुळे ही घटना घडल्याचा रीनाच्या नातेवाईकांनी आरोप केला. शुक्रवारी ऐन संध्याकाळी 180 मोटारमन अचानक कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे मुंबईकरांचे पुरते हाल झाले. चर्चगेट,दादर स्थानकावरुन एकच गर्दी उसळली होती. संध्याकाळी 7 :30 च्या सुमाराला आंदोलन मागे घेण्यात आले पण रेल्वे तुडुंब भरून वाहत होत्या. अशाच एका तुडुंब भरलेल्या रेल्वेतून रीना कुलकर्णी ह्या प्रवास करत होत्या. बोरीवली स्टेशनजवळ रेल्वेमधून रीना यांचा तोल गेला. शेजारच्या ट्रकवरुन येणारी फ्लाईंग राणी या गाडीखाली त्यांचा दुदैर्वी मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 21, 2012 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close