S M L

ठाण्याच्या महापौरांवर कारवाईची टांगती तलवार

24 जुलैठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील सध्या चांगलेच वादात अडकले आहे. महापौरांनी अधिकार्‍यांना धमकावल्याबाबत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी आणि गैरवर्तन केल्यामुळे महापौरांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवलं जावं अशी मागणी महापालिका आयुक्त आर.ए.राजीव यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवला आहे. आपल्या प्रभागातील व्यायमशाळेच्या साहित्य खरेदीच्या फायलीवर आपल्या म्हणण्याप्रमाणे शेरा न दिल्यानं चीफ ऑडिटर सत्यवान उबाळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याबाबतची तक्रार उबाळे यांनी आयुक्त आर.ए.राजीव यांच्याकडे केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2012 07:34 AM IST

ठाण्याच्या महापौरांवर कारवाईची टांगती तलवार

24 जुलै

ठाण्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील सध्या चांगलेच वादात अडकले आहे. महापौरांनी अधिकार्‍यांना धमकावल्याबाबत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी आणि गैरवर्तन केल्यामुळे महापौरांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवलं जावं अशी मागणी महापालिका आयुक्त आर.ए.राजीव यांनी केली आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठवला आहे. आपल्या प्रभागातील व्यायमशाळेच्या साहित्य खरेदीच्या फायलीवर आपल्या म्हणण्याप्रमाणे शेरा न दिल्यानं चीफ ऑडिटर सत्यवान उबाळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याबाबतची तक्रार उबाळे यांनी आयुक्त आर.ए.राजीव यांच्याकडे केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2012 07:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close