S M L

आनंद परांजपेंच्या दहीहंडी उत्सवावरुन युतीत वाद

24 जुलैशिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानं त्यांच्याविरोधात शिवसेनेत संतापाचं वातावरण आहे. आणि आता परांजपे यांच्या दहीहंडी उत्सवावरुनही कल्याण डोंबिवलीत राजकारण तापलंय. डोबिंवली पश्चिम इथल्या भागशाळा मैदानात दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी परांजपे यांना महापालिकेनं परवानगी दिली. पण यावरुन शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांमध्येच वाद रंगलाय. सेनेनं या दहीहंडी उत्सवाला विरोध केला असताना भाजपच्या नगरसेवकांनी आनंद परांजपे यांना परवानगी देण्याचं समर्थन केलं. त्यावरुन हा वाद रंगला. शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांना महासभा सुरू असताना धक्काबुक्की केली. त्याचबरोबर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला यावेळी काही नगरसेवकांनी शिविगाळ देखील केली. नगरसेवक राहुल दामले यांच्या रेनवॉटर हॉर्वेस्टिंगच्या प्रस्तावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केला होता म्हणून राहुल दामले यांनी खासदारांना दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मैदानाची दिलेली परवानगी रद्द करावी या सेनेच्या प्रस्तावाला विरोध केला. त्यावेळी ही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळे शिवसेना आणि खासदार आनंद परांजपे यांच्यातील वैर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय.खासदार आनंद परांजपे यांना परवानगी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दबाव आणल्याचा आरोपही शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलाय. तसेच त्यांच्या दहीहंडीला अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2012 09:44 AM IST

आनंद परांजपेंच्या दहीहंडी उत्सवावरुन युतीत वाद

24 जुलै

शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानं त्यांच्याविरोधात शिवसेनेत संतापाचं वातावरण आहे. आणि आता परांजपे यांच्या दहीहंडी उत्सवावरुनही कल्याण डोंबिवलीत राजकारण तापलंय. डोबिंवली पश्चिम इथल्या भागशाळा मैदानात दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी परांजपे यांना महापालिकेनं परवानगी दिली. पण यावरुन शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांमध्येच वाद रंगलाय.

सेनेनं या दहीहंडी उत्सवाला विरोध केला असताना भाजपच्या नगरसेवकांनी आनंद परांजपे यांना परवानगी देण्याचं समर्थन केलं. त्यावरुन हा वाद रंगला. शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी भाजपचे नगरसेवक राहुल दामले यांना महासभा सुरू असताना धक्काबुक्की केली. त्याचबरोबर शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला यावेळी काही नगरसेवकांनी शिविगाळ देखील केली. नगरसेवक राहुल दामले यांच्या रेनवॉटर हॉर्वेस्टिंगच्या प्रस्तावाला शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोध केला होता म्हणून राहुल दामले यांनी खासदारांना दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मैदानाची दिलेली परवानगी रद्द करावी या सेनेच्या प्रस्तावाला विरोध केला. त्यावेळी ही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळे शिवसेना आणि खासदार आनंद परांजपे यांच्यातील वैर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय.खासदार आनंद परांजपे यांना परवानगी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दबाव आणल्याचा आरोपही शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलाय. तसेच त्यांच्या दहीहंडीला अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2012 09:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close