S M L

कोण होणार राष्ट्रपती ?

22 जुलैदेशाचे 14 वे राष्ट्रपती कोण याचा फैसला आज होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारी 4वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. गुरुवारी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झालं होतं. देशभरातील 72 टक्के खासदार आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्याची आज मतमोजणी होतेय. देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मतपेट्या संसदभवनात आणण्यात आल्या आहेत. 6 विभागात ही मतमोजणी होणार आहे. यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी आणि भाजप प्रणित आघाडीचे पी.ए. संगमा यांच्यापैकी रायसीना हिलवर कोण जाणार याचा फैसला होणार आहे. आघाडीतल घटक पक्षांसह तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ऐन वेळी पाठिंबा दिल्यामुळे प्रणव मुखर्जी यांचं पारडं जड मानलं जातंय. प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा - जन्म : 11 डिसेंबर 1935 - इतिहास आणि राज्यशास्त्रात MA- 1973 : इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात उद्योग खात्याचे उपमंत्री म्हणून प्रवेश- 1982 ते 1984 या काळात अर्थमंत्री - इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधींशी झालेल्या मतभेदांतून काँग्रेस सोडली - स्वत:चा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष काढला- 1989 : मुखर्जी काँग्रेस पक्षात परतले - पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री- वाजपेयी सरकारच्या काळात काँग्रेसचे राज्यसभेतले उपनेते म्हणून काम- 2004 : संरक्षणमंत्री- 2006 : परराष्ट्रमंत्री - 2008 : अर्थमंत्री पी.ए. संगमा यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा - जन्म : 1 सप्टेंबर 1947- आंतरराष्ट्रीय व्यवहारविषयात MA- 1973 : मेघालय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष- 1977 : 6 व्या लोकसभेत तुरा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय- 1988 : मेघालय राज्याचे मुख्यमंत्री- 1996 ते 1998 काळात लोकसभेचे सभापती - 1999 : सोनियांच्या परदेशीपणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून हकालपट्टी- शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना- 2004 : शरद पवार यूपीएत सामील झाल्यानं राष्ट्रवादीला रामराम- 2005 : ममता बॅनजीर्ंशी जुळवून घेत राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेसची स्थापना- 2006 : पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले- मुलगी अगाथा संगमा 2009 पासून केंद्रात ग्रामीण विकास राज्यमंत्री

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 22, 2012 06:11 AM IST

कोण होणार राष्ट्रपती ?

22 जुलै

देशाचे 14 वे राष्ट्रपती कोण याचा फैसला आज होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारी 4वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. गुरुवारी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झालं होतं. देशभरातील 72 टक्के खासदार आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्याची आज मतमोजणी होतेय. देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मतपेट्या संसदभवनात आणण्यात आल्या आहेत. 6 विभागात ही मतमोजणी होणार आहे. यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी आणि भाजप प्रणित आघाडीचे पी.ए. संगमा यांच्यापैकी रायसीना हिलवर कोण जाणार याचा फैसला होणार आहे. आघाडीतल घटक पक्षांसह तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी ऐन वेळी पाठिंबा दिल्यामुळे प्रणव मुखर्जी यांचं पारडं जड मानलं जातंय.

प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा - जन्म : 11 डिसेंबर 1935 - इतिहास आणि राज्यशास्त्रात MA- 1973 : इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात उद्योग खात्याचे उपमंत्री म्हणून प्रवेश- 1982 ते 1984 या काळात अर्थमंत्री - इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधींशी झालेल्या मतभेदांतून काँग्रेस सोडली - स्वत:चा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष काढला- 1989 : मुखर्जी काँग्रेस पक्षात परतले - पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री- वाजपेयी सरकारच्या काळात काँग्रेसचे राज्यसभेतले उपनेते म्हणून काम- 2004 : संरक्षणमंत्री- 2006 : परराष्ट्रमंत्री - 2008 : अर्थमंत्री

पी.ए. संगमा यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा - जन्म : 1 सप्टेंबर 1947- आंतरराष्ट्रीय व्यवहारविषयात MA- 1973 : मेघालय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष- 1977 : 6 व्या लोकसभेत तुरा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर विजय- 1988 : मेघालय राज्याचे मुख्यमंत्री- 1996 ते 1998 काळात लोकसभेचे सभापती - 1999 : सोनियांच्या परदेशीपणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून हकालपट्टी- शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना- 2004 : शरद पवार यूपीएत सामील झाल्यानं राष्ट्रवादीला रामराम- 2005 : ममता बॅनजीर्ंशी जुळवून घेत राष्ट्रवादी तृणमूल काँग्रेसची स्थापना- 2006 : पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले- मुलगी अगाथा संगमा 2009 पासून केंद्रात ग्रामीण विकास राज्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2012 06:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close