S M L

काँग्रेसची हातावर 'घडी' तोंडावर बोट !

24 जुलैयूपीएच्या खेळीवर शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्ती केली. महाराष्ट्रात राष्ट्रवादींच्या शिलेदारांची बैठक घेतल्यानंतर शिलेदारांनीही काँग्रेसवर नाराजीचा सुर आवळला. मात्र एकाच घरात सुरु झालेल्या रुसव्या-फुगव्यावर काँग्रेसने हातावर घडी तोंडावर बोट ठेवले आहे. राष्ट्रवादीच्या मागण्यांना काँग्रेसकडून थंड प्रतिसाद मिळतोय. काँग्रेसतर्फे शुक्रवारपासून कोणताही संवाद साधण्यात आलेला नाही. उद्यापर्यंत काँग्रेसने चर्चा केली तर आम्ही गुरुवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीला जायला तयार आहोत अशी थोडी मवाळ भुमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. राष्ट्रवादीच्या केंद्रीय पातळीवरच्या एका नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर ही माहिती दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटवण्याचा किंवा सुप्रीया सुळेंना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी केली नसल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्नही या नेत्यानं आयबीएन नेटवर्कशी बोलताना केला. तसेच सरकारमध्ये राहायचं की, बाहेरुन पाठिंबा द्यायचा याबाबत राष्ट्रवादी दोन दिवसात अंतिम निर्णय घेणार आहे. अशी माहितीही सुत्राने दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 24, 2012 10:40 AM IST

काँग्रेसची हातावर 'घडी' तोंडावर बोट !

24 जुलै

यूपीएच्या खेळीवर शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्ती केली. महाराष्ट्रात राष्ट्रवादींच्या शिलेदारांची बैठक घेतल्यानंतर शिलेदारांनीही काँग्रेसवर नाराजीचा सुर आवळला. मात्र एकाच घरात सुरु झालेल्या रुसव्या-फुगव्यावर काँग्रेसने हातावर घडी तोंडावर बोट ठेवले आहे. राष्ट्रवादीच्या मागण्यांना काँग्रेसकडून थंड प्रतिसाद मिळतोय. काँग्रेसतर्फे शुक्रवारपासून कोणताही संवाद साधण्यात आलेला नाही. उद्यापर्यंत काँग्रेसने चर्चा केली तर आम्ही गुरुवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीला जायला तयार आहोत अशी थोडी मवाळ भुमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. राष्ट्रवादीच्या केंद्रीय पातळीवरच्या एका नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर ही माहिती दिली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटवण्याचा किंवा सुप्रीया सुळेंना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी केली नसल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्नही या नेत्यानं आयबीएन नेटवर्कशी बोलताना केला. तसेच सरकारमध्ये राहायचं की, बाहेरुन पाठिंबा द्यायचा याबाबत राष्ट्रवादी दोन दिवसात अंतिम निर्णय घेणार आहे. अशी माहितीही सुत्राने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 24, 2012 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close