S M L

पोलिसांच्या साक्षीने टोलनाक्यावर जनतेची लूट

26 जुलैराज्यात टोलच्या नावाखाली जनतेची लूट सुरू असल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल न भरण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे पोलिसांच्या संरक्षणात टोलवसुली सुरू आहे. पण औरंगाबादमधल्या जळगाव रस्त्यावर हर्सुल टोलनाक्यावर जनतेची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. या टोलनाक्यावर आमची टीम पोहोचली तेव्हा इथं अनेक गाड्यांना पावती न देता फक्त पैसे घेऊन जाऊ दिलं जात असल्याचं दिसलं. जळगाव रस्त्यावर असलेल्या या टोलनाक्यावर चारचाकी वाहनांसाठी 20 रुपये इतका टोल आकारला जातो. पण, त्याठिकाणी 5 आणि 10 रुपये घेऊन पावती न देताच गाडया सोडल्या जात आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या साक्षीनंच हा प्रकार सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2012 10:24 AM IST

पोलिसांच्या साक्षीने टोलनाक्यावर जनतेची लूट

26 जुलै

राज्यात टोलच्या नावाखाली जनतेची लूट सुरू असल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल न भरण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे पोलिसांच्या संरक्षणात टोलवसुली सुरू आहे. पण औरंगाबादमधल्या जळगाव रस्त्यावर हर्सुल टोलनाक्यावर जनतेची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. या टोलनाक्यावर आमची टीम पोहोचली तेव्हा इथं अनेक गाड्यांना पावती न देता फक्त पैसे घेऊन जाऊ दिलं जात असल्याचं दिसलं. जळगाव रस्त्यावर असलेल्या या टोलनाक्यावर चारचाकी वाहनांसाठी 20 रुपये इतका टोल आकारला जातो. पण, त्याठिकाणी 5 आणि 10 रुपये घेऊन पावती न देताच गाडया सोडल्या जात आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या साक्षीनंच हा प्रकार सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2012 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close