S M L

पवार प्ले, राज्याला तीन हजार कोटींचे दुष्काळी पॅकेज ?

25 जुलैराष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नाराजीवर औषध शोधत केंद्र सरकार लवकरच महाराष्ट्रासाठी दुष्काळी पॅकेज घोषित करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार राज्याला तीन ते साडेतीन हजार कोटींचं दुष्काळी पॅकेज देऊ शकतं. राष्ट्रवादीनं काँग्रेसपुढे जे काही मागण्या ठेवल्यात त्यामध्ये दुष्काळासाठी भरीव तरतुदीची मागणी केली आहे.सध्या राज्यातल्या दोन तृतीयांश भागावर दुष्काळाचं सावट आहे. राज्यातल्या 355 पैकी 228 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. पाऊस असाच लांबत राहीला तर या तालुक्यांवर दुष्काळाची परिस्थिती ओढवू शकते. दोनच दिवसांपुर्वी शरद पवार यांच्या गैरहजेरीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कृषी खात्याला तातडीने अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या आहे. राज्याची परिस्थिती- 10 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 25% पाऊस - 69 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 25 ते 50% पाऊस - पुणे, सातारा, सांगली, बीड आणि चंद्रपूरच्या काही भागात परिस्थिती गंभीर- खरीप पिकांच्या पेरणीची स्थिती चिंताजनक- आतापर्यंत अंदाजे 79% पेरण्या पूर्ण- 202 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पेरण्या- 90 तालुक्यांमध्ये 25% पेक्षा कमी पेरण्या- राज्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर - 100 तालुक्यांमधील तब्बल 15 हजार गावांमध्ये काही दिवसांत पाणीटंचाई जाणवू शकते

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2012 10:39 AM IST

पवार प्ले, राज्याला तीन हजार कोटींचे दुष्काळी पॅकेज ?

25 जुलै

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नाराजीवर औषध शोधत केंद्र सरकार लवकरच महाराष्ट्रासाठी दुष्काळी पॅकेज घोषित करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार राज्याला तीन ते साडेतीन हजार कोटींचं दुष्काळी पॅकेज देऊ शकतं. राष्ट्रवादीनं काँग्रेसपुढे जे काही मागण्या ठेवल्यात त्यामध्ये दुष्काळासाठी भरीव तरतुदीची मागणी केली आहे.सध्या राज्यातल्या दोन तृतीयांश भागावर दुष्काळाचं सावट आहे. राज्यातल्या 355 पैकी 228 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. पाऊस असाच लांबत राहीला तर या तालुक्यांवर दुष्काळाची परिस्थिती ओढवू शकते. दोनच दिवसांपुर्वी शरद पवार यांच्या गैरहजेरीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कृषी खात्याला तातडीने अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या आहे.

राज्याची परिस्थिती

- 10 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 25% पाऊस - 69 तालुक्यांमध्ये आतापर्यंत 25 ते 50% पाऊस - पुणे, सातारा, सांगली, बीड आणि चंद्रपूरच्या काही भागात परिस्थिती गंभीर- खरीप पिकांच्या पेरणीची स्थिती चिंताजनक- आतापर्यंत अंदाजे 79% पेरण्या पूर्ण- 202 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पेरण्या- 90 तालुक्यांमध्ये 25% पेक्षा कमी पेरण्या- राज्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर - 100 तालुक्यांमधील तब्बल 15 हजार गावांमध्ये काही दिवसांत पाणीटंचाई जाणवू शकते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2012 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close