S M L

बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा; 3 दिवसांनंतर डिस्चार्ज

26 जुलैशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा होतेय. श्वसनाच्या त्रासामुळे दोन दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमीट आहेत. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, तसेच आज बाळासाहेबांनी पेपरही वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण अजून दोन ते तीन दिवस बाळासाहेब ठाकरेंना हॉस्पिटलमध्येच रहावं लागणार आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनीही बाळासाहेबांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, दिग्दर्शक मधुर भांडारकर यावेळी उपस्थित होते. यावेळी मधुर भांडारकर यांनी त्यांच्या नव्या सिनेमाबद्दल बाळासाहेबांना माहितीही दिली. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनीही आज बाळासाहेबांची भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 26, 2012 10:28 AM IST

बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा; 3 दिवसांनंतर डिस्चार्ज

26 जुलै

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा होतेय. श्वसनाच्या त्रासामुळे दोन दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमीट आहेत. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, तसेच आज बाळासाहेबांनी पेपरही वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण अजून दोन ते तीन दिवस बाळासाहेब ठाकरेंना हॉस्पिटलमध्येच रहावं लागणार आहे. दरम्यान, भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनीही बाळासाहेबांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, दिग्दर्शक मधुर भांडारकर यावेळी उपस्थित होते. यावेळी मधुर भांडारकर यांनी त्यांच्या नव्या सिनेमाबद्दल बाळासाहेबांना माहितीही दिली. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनीही आज बाळासाहेबांची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 26, 2012 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close