S M L

अखेर राष्ट्रवादीच्या नाराजीनाट्यावर पडदा

25 जुलैगेल्या आठवडाभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर आज अखेर पडदा पडला. केंद्रात आणि महाराष्ट्रात आघाडीत सुसंवाद राहावा, यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यावर सहमती झाली आणि आपली नाराजी दूर झाल्याचं राष्ट्रवादीनं सांगितलं. शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि सोनिया गांधी यांची पंतप्रधानांच्या घरी बैठक झाली. केंद्रात समन्वय समिती स्थापन करणार आणि त्याच समितीच्याच धर्तीवर महाराष्ट्रातली समन्वय समितीही काम करेल, असा निर्णय या बैठकीत झाल्याचं पटेल यांनी सांगितलं. तसंच महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदल किंवा राज्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे घोटाळे लपवण्यासाठीचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न होता, या चर्चांचंही त्यांनी पूर्णपणे खंडन केलं. असं असलं तरी फक्त समन्वय समितीच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने हा खटाटोप केला नाही. पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्याचं समजतंय. फक्त समन्वय समितीच्या मागणीसाठी पवार नाराज नव्हते हे जरी खरं असलं तरी समन्वय समितीची स्थापना ही पवारांची महत्त्वाची मागणी होती. त्यामागे काय भूमिका आहे. समन्वय समिती का ?- समन्वय समितीची मागणी सर्वांत आधी द्रमुक आणि त्यानंतर तृणमूलनं केली- डाव्यांचा पाठिंबा असलेल्या यूपीए-1मध्ये समन्वय समिती होती- यूपीए-1 मध्ये सर्व निर्णय हे मित्रपक्षांशी सल्लामसलत करून घेतले जात- काँग्रेसला अधिक जागा मिळाल्याने यूपीए-2 मध्ये काँग्रेसचं वर्चस्व- यूपीए-2 मध्ये महत्त्वाचे निर्णय काँग्रेस कोअर कमिटीत घेतले जातात- सरकारी योजनांचं श्रेय काँग्रेस लाटतं, अशी मित्रपक्षांमध्ये भावना- दूरसंचार, रेल्वे यांसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर काँग्रेसने मित्रपक्षांकडे बोट दाखवलं- समन्वय समितीमुळे वादग्रस्त मुद्द्यांची जबाबदारीही सर्वांना घ्यावी लागेल

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 25, 2012 01:31 PM IST

अखेर राष्ट्रवादीच्या नाराजीनाट्यावर पडदा

25 जुलै

गेल्या आठवडाभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर आज अखेर पडदा पडला. केंद्रात आणि महाराष्ट्रात आघाडीत सुसंवाद राहावा, यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यावर सहमती झाली आणि आपली नाराजी दूर झाल्याचं राष्ट्रवादीनं सांगितलं. शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि सोनिया गांधी यांची पंतप्रधानांच्या घरी बैठक झाली. केंद्रात समन्वय समिती स्थापन करणार आणि त्याच समितीच्याच धर्तीवर महाराष्ट्रातली समन्वय समितीही काम करेल, असा निर्णय या बैठकीत झाल्याचं पटेल यांनी सांगितलं. तसंच महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदल किंवा राज्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे घोटाळे लपवण्यासाठीचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न होता, या चर्चांचंही त्यांनी पूर्णपणे खंडन केलं. असं असलं तरी फक्त समन्वय समितीच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने हा खटाटोप केला नाही. पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्याचं समजतंय.

फक्त समन्वय समितीच्या मागणीसाठी पवार नाराज नव्हते हे जरी खरं असलं तरी समन्वय समितीची स्थापना ही पवारांची महत्त्वाची मागणी होती. त्यामागे काय भूमिका आहे.

समन्वय समिती का ?

- समन्वय समितीची मागणी सर्वांत आधी द्रमुक आणि त्यानंतर तृणमूलनं केली- डाव्यांचा पाठिंबा असलेल्या यूपीए-1मध्ये समन्वय समिती होती- यूपीए-1 मध्ये सर्व निर्णय हे मित्रपक्षांशी सल्लामसलत करून घेतले जात- काँग्रेसला अधिक जागा मिळाल्याने यूपीए-2 मध्ये काँग्रेसचं वर्चस्व- यूपीए-2 मध्ये महत्त्वाचे निर्णय काँग्रेस कोअर कमिटीत घेतले जातात- सरकारी योजनांचं श्रेय काँग्रेस लाटतं, अशी मित्रपक्षांमध्ये भावना- दूरसंचार, रेल्वे यांसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर काँग्रेसने मित्रपक्षांकडे बोट दाखवलं- समन्वय समितीमुळे वादग्रस्त मुद्द्यांची जबाबदारीही सर्वांना घ्यावी लागेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2012 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close