S M L

वांग मराठवाडी धरणग्रस्त पाण्यात, सरकार अजूनही सुस्त

27 जुलैएकीकडे दिल्लीत भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू आहे तर सातारा वांगमराठवाडी इथे धरणग्रस्तांचं आंदोलन चिघळत चाललंय. पावसाची संततधार सुरु असल्यानं धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आंदोलनाचा आजचा 23 वा दिवस आहे. काल धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं दोन गावांचा संपर्क तुटला आहे. आंदोलनकर्त्या शोभा पाटील पाण्यात बुडाल्या, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. धरणग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या निषेधासाठी शेतकर्‍यांनी धरणावरच आंदोलन सुरु केलंय. दरम्यान, आज या आंदोलनकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु र उपस्थित होत्या. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2012 09:53 AM IST

वांग मराठवाडी धरणग्रस्त पाण्यात, सरकार अजूनही सुस्त

27 जुलै

एकीकडे दिल्लीत भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू आहे तर सातारा वांगमराठवाडी इथे धरणग्रस्तांचं आंदोलन चिघळत चाललंय. पावसाची संततधार सुरु असल्यानं धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. आंदोलनाचा आजचा 23 वा दिवस आहे. काल धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं दोन गावांचा संपर्क तुटला आहे. आंदोलनकर्त्या शोभा पाटील पाण्यात बुडाल्या, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. धरणग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याच्या निषेधासाठी शेतकर्‍यांनी धरणावरच आंदोलन सुरु केलंय. दरम्यान, आज या आंदोलनकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु र उपस्थित होत्या. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2012 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close