S M L

उध्दवदादांना राज यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

27 जुलैगेल्या काही वर्षांपासून ठाकरे कुटुंबात निर्माण झालेला दुरावा आता कमी होताना दिसतोय. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरेंनी पुष्पगुच्छ पाठवला आहे. शिवसेना सोडल्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर राज यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. उध्दव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे अलीकडेच त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. या आजारपणानिमित्त राजकारण बाजूला ठेवून राज यांनी उध्दव यांची भेट घेतली. तब्बल साडेतीन वर्षानंतर राज-उध्दव यांची भेट पाहून अख्खा महाराष्ट्र अवाक् झाला. उपचारानंतर खुद्द राज यांनी उध्दव यांना हॉस्पिटलमधून मातोश्रीवर सोडलं. यावेळी राज हे उध्दव यांचे सारर्थी बनले होते. हा क्षण पाहुन अनेक जण भावूक झाले. जे भाऊ गेल्या सहावर्षापासून एकमेकांना पाण्यात पाहणारे आज एकत्र आलेले पाहून राजकारणापलीकडेही रक्ताचे नाते असतात अशीच भावना सैनिकांनी व्यक्त केली. पण या भेटीवरून सेना-मनसे एकत्र येणार अशा चर्चेला उतू आला होता. पण राज यांनी पत्रकार परिषदेत जे तुमच्या मनात आहे ते माझ्या मनात नाही असं सांगत चर्चेवर पडदा टाकला. पण अर्थाचा अर्थ काढणारे थांबणार नाही. आता याबद्दल येणार काळात याचे काय पडसाद पडतील ते पाहण्यासारखे ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 27, 2012 12:39 PM IST

उध्दवदादांना राज यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

27 जुलै

गेल्या काही वर्षांपासून ठाकरे कुटुंबात निर्माण झालेला दुरावा आता कमी होताना दिसतोय. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरेंनी पुष्पगुच्छ पाठवला आहे. शिवसेना सोडल्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर राज यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

उध्दव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे अलीकडेच त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. या आजारपणानिमित्त राजकारण बाजूला ठेवून राज यांनी उध्दव यांची भेट घेतली. तब्बल साडेतीन वर्षानंतर राज-उध्दव यांची भेट पाहून अख्खा महाराष्ट्र अवाक् झाला. उपचारानंतर खुद्द राज यांनी उध्दव यांना हॉस्पिटलमधून मातोश्रीवर सोडलं. यावेळी राज हे उध्दव यांचे सारर्थी बनले होते. हा क्षण पाहुन अनेक जण भावूक झाले. जे भाऊ गेल्या सहावर्षापासून एकमेकांना पाण्यात पाहणारे आज एकत्र आलेले पाहून राजकारणापलीकडेही रक्ताचे नाते असतात अशीच भावना सैनिकांनी व्यक्त केली. पण या भेटीवरून सेना-मनसे एकत्र येणार अशा चर्चेला उतू आला होता. पण राज यांनी पत्रकार परिषदेत जे तुमच्या मनात आहे ते माझ्या मनात नाही असं सांगत चर्चेवर पडदा टाकला. पण अर्थाचा अर्थ काढणारे थांबणार नाही. आता याबद्दल येणार काळात याचे काय पडसाद पडतील ते पाहण्यासारखे ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 27, 2012 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close